महिलने असं काही केलं की, हवेत उडाली कार...
विश्वास बसणार नाही पण खरं आहे
नवी दिल्ली : कार चालवत असताना गोंधळ, घाई, गडबड जिवावर बेतू शकतं. याचचं एक उदाहरण समोर आलं आहे. एक महिला कार चालक गाडी पार्क करत असताना गोंधळते आणि घडतो विचित्र प्रकार. ही महिला कार चालक गाडीचा ब्रेक दाबण्याऐवजी चक्क एक्सिलेटर दाबते आणि मग घडतो धक्कादायक प्रकार...
महिला कार चालकाने कार पार्किंग परिसरात गाडी पार्क करत असताना ब्रेक दाबण्याऐवजी एक्सिलेटर प्रेस करते आणि त्यानंतर गाडी चौथ्या मजल्यावरुन खाली कोसळणार असते तितक्यात रेलिंगला अटकते.
या घटनेत महिला कार चालकला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं आहे तर कारही चौथ्या मजल्यावरुन कोसळण्यापासून रोखली आहे. तसेच या दुर्घटनेत सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाहीये.
ही धक्कादायक घटना अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये घडली आहे. एका मल्टिलेवल पार्किंग परिसरात हा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक महिला मल्टिलेवल पार्किंगमध्ये आपली गाडी घेऊन दाखल झाली. ज्यावेळी ती चौथ्या मजल्यावर पोहोचली त्यावेळी तिने ब्रेक ऐवजी चुकून एक्सिलेटर प्रेस केला. यानंतर महिलेला काही समजण्यापूर्वी कारने कठडा तोडला आणि चौथ्या मजल्यावरुन खाली कोसळण्याच्या स्थितीत अडकली.
घडलेला प्रकार पाहून तेथे उपस्थित नागरिकाने महिलेला सुरक्षित बाहेर काढलं आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेचे फोटोज सँटा मॉनिका फायर डिपार्टमेंटने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट केली आहेत.