शांघाय : एकदा विकलेली वस्तू परत घेतली जाणार नाही, ग्राहकांकडून सामान तुटल्यास दुकानदार जबाबदार राहणार अशा आशयाच्या पाट्या आपण अनेक दुकांनांवर पाहतो. चीनमध्ये एका महिलेला हे चांगलच महागात पडलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनच्या दक्षिण पूर्व प्रांतातील युनानमधील रुईली या शहरातील जेड मार्केटमध्ये महिला पर्यटक महिला फिरण्यासाठी गेली होती. 


एका दुकानात ती जेड ब्रेसलेट पाहण्यासाठी गेली. यावेळी जेड ब्रेसलेट घालून पाहत असताना तिच्या हातातून ते पडले आणि त्याचे दोन तुकडे झाले. त्या महिलेने ब्रेसलेटवरील किंमतीचे लेबल पाहिले आणि ती बेशुद्धच पडली. 


दुकानदाराने त्या महिलेकडे भरपाई म्हणून $25,000 मागितले मात्र महिलेने आपल्याकडे केवळ $1,500 असल्याचे सांगितले.