चीन: एका महिलेला चिकटपट्ट्यांनी गुंडाळून भिंतीवर टांगलेल्या अवस्थेतील फोटो सध्या सोशल मीडीयामध्ये व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा फोटो बघून तुम्हांला हसू आवरणं शक्य नसले तरीही त्यामागील कारणही अजब आहे. 


भिंतीवर या मुलीला बॉसने शिक्षा म्हणून चिटकवले आहे. ऑफिस मध्ये येताना या मुलीने गाडी चालवताना सीट बेल्ट लावला नव्हता. हे बॉसने पाहिल्यानंतर तिला ऑफिसमध्ये ही शिक्षा दिली.  


चीनमधील व्हिबो साईटवर एका कर्मचार्‍याने फोटो शेअर केला आहे. आमच्या कंपनीत वाहतुकीचे निमय मोडणाऱ्यांना अशी शिक्षा दिली जाते, असे कॅप्शन त्याखाली लिहले आहे.कामावर उशीर येणं, वेळेच्या आधी निघणं अशा चूकांनादेखील चीनमधील या कंपनीमध्ये अजब शिक्षा मिळते. असे देेखील या कर्मचार्‍यााने लिहले आहे.