Woman living with husband and boyfriend together : पती पत्नी और वो...80 च्या दशकात आलेल्या चित्रपटाने एकच खळबळ माजली होती. नवरा बायकोमध्ये तिसरं त्या काळात अशा विषयाला हात लावणे एका दिग्दर्शकासाठी कठीण होतं. पण नंतरच्या काळात अनिल कपूरची घरवाली आणि बाहरवाली चित्रपट खूप लोकप्रिय झाला होता. पूर्वीपासून पती पत्नी आणि ती असे अनेक प्रकरण होते. पण घरातील स्त्री ते निमूटपणे सहन करत होती. आजचा काळ बदला आहे. महिला पण घराबाहेर पडायला लागल्या आहेत. नातेसंबंधाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला आहे. लग्नानंतर नवरा असो या बायको विवाहबाह्य संबंध ठेवताना दिसतं आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांचे संसार मोडून आपल्या प्रियकर किंवा प्रियशीसोबत कलाकार राहताना दिसत आहेत. लग्नापेक्षा लिव्हिंगमध्ये जोडपी राहत आहेत. नुकतच हैदराबादमध्ये एका तरुणाने एकाच मंडपात दोन तरुणीसोबत लग्न...दुसरीकडे एक प्रकरण तर कोर्टात पोहोचले तिथे पतीची दोन पत्नीसोबत वाटणी करण्यात आली. तीन दिवस एका पत्नीसोबत तीन दिवस दुसरीसोबत आणि रविवारी सुट्टी...


पण सध्या सोशल मीडियावर एका वेगवेगळ्याच नात्याची चर्चा होते आहे. एक महिला तिच्या पती आणि प्रियकरासोबत एकाच घरात राहते. यावरुन ती महिला सोशल मीडियावर ट्रोल होते. मात्र तिच्या ओपन रिलेशनशिपबद्दल ती खूश आहे. विशेष म्हणजे तिचा नवरा आणि प्रियकरालाही याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. 



सारा असं या महिलेचं नाव असून ती सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. साराने तिच्या या ओपन रिलेशनशिपबद्दल सांगणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचा एका टिकटॉक व्हिडीओला 1,71,400 व्ह्यूज मिळाले आहेत...


साराच्या पतीचं नाव रायन आणि बॉयफ्रेंडचं नाव रॉनी आहे. सारा तिचा नवरा आणि बॉयफ्रेंड तिघ घरात एकत्र कसे राहतात, तिघेही घरात कसे झोपतात याबद्दल सांगितलं आहे. जे लोक आधीपासूनच ट्रिपल रिलेशनशिपमध्ये राहतात त्यांनी साराला सपोर्ट केला आहे. मात्र इतर यूजर्स साराच्या या नात्यावर टीका करतना दिसतात. एका यूजर्सने साराला म्हटलं की, तू भाग्यवान आहे, दोन जणांसोबत एकत्र राहते. तर दुसरा यूजर म्हणतो, तुम्ही खूप छान आयुष्य जगत आहात. 




  
दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये साराने प्रियकर आणि पतीला काय आवडत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यात पती रायनने सांगितलं की, सारा स्वयंपाक उत्कृष्ट बनवते. त्याचवेळी रॉनीने रायनचं कौतुक करताना दिसला आहे. तो म्हणाला की, तो ज्याप्रकारे सारावर प्रेम करतो आणि तिचा आदर करतो ते पाहण्यासारखं आहे.