Girl needed surgery after first kiss: पहिलं चुंबन या विषयावर प्रेमवीरांपासून ते कवींपर्यंत अनेकांनी अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. प्रेमाच्या वाटेवरील हा फार नाजूक आणि तितकाच कायम लक्षात राहणारा क्षण अनेकदा साहित्यामधून डोकावतो. आपल्या आयुष्यातील पहिलं चुंबन (first kiss) हे अनेकांसाठी अविस्मरणीय अनुभव असतो आणि तो आयुष्यभर लक्षात राहतो. मात्र तुर्कीमधील एका मॉडेलला मात्र डेटदरम्यान पहिल्यांदा चुंबन घेणं एवढं महाग पडलं की तिला थेट रुग्णालयात दाखल करुन तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली.


लोकांनी दिले अजब सल्ले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेडा एसॉय (Ceyda Ersoy) नावाच्या या मुलीचं तिच्या पार्टनर एवढ्या जोरात चुंबन घेतलं की या मुलीच्या जीभेला गंभीर जखम झाली.  या प्रकारानंतर सेडाने रुग्णालयामध्ये धाव घेतली. डॉक्टरांकडून योग्य उपचार करुन घेतल्यानंतरच तिला डिस्चार्ज मिळाला. या मुलीने आपली व्यथा इन्स्टाग्रामवर एका पोस्टच्या माध्यमातून मांडली आहे. ही पोस्ट वाचून लोक तिला अजब सल्ले देत आहेत. 


"माझ्या पर्टनरचं स्वत:वर नियंत्रण राहिलं नाही आणि..."


34 वर्षीय तुर्कीश वंशाची सेडा ही सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सरही आहे. जगभरामधील लाखो लोक तिला इन्स्टाग्रामवर (ceyda ersoy instagram) फॉलो करतात. रुग्णालयामध्ये उपचार घेतल्यानंतर तिने आपल्या प्रकृतीबद्दल चाहत्यांना सोशल मीडियावरुन माहिती दिली आहे. सेडाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. "मी माझ्या पहिल्या डेटला गेले होते. फ्रेंच किस करताना आम्ही दोघे एकमेकांमध्ये हरवले. त्यावेळी माझ्या पर्टनरचं स्वत:वर नियंत्रण राहिलं नाही आणि त्याने माझं अशाप्रकारे चुंबन ङेतलं की माझ्या जीभेमधून रक्त येऊ लागलं. मला तातडीने रुग्णालयात धाव घ्यावी लागली. कदाचित चुंबन घेताना जीभेला जखम झालेली मी पहिलीच मुलगी असेल. ही मस्करी नाही. मला फार त्रास होत आहे. त्यामुळे तुम्हीही काळजी घ्या," अशं सेडाने म्हटलं आहे.


...त्यामुळे हे झालं असावं


'द मिरर'ने दिलेल्या वृत्तानुसार सेडाने आपल्या पुढील पोस्टमध्ये चाहत्यांना, "मित्रांनो आता मी ठीक आहे. तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. माझी शस्त्रक्रीया यशस्वी झाली आहे. डॉक्टरांनी टाके घालून जीभवरील फाटलेली त्वचा शिवली आहे. काही दिवस मी बोलू शकणार नाही. मला वाटतं की माझ्या पार्टनरला फ्रेंच किस कशापद्धतीने करावा हे ठाऊक नसावं. त्यामधूनच हा सारा गोंधळ निर्माण झाला. मला वाटतं की मी त्याला फार चांगल्या पद्धतीने ओळखत नाही कारण आमच्या भेटीला एका महिन्याचाही कालावधी झालेला नाही," असंही सांगितलं आहे.