बिजिंग : गोठलेल्या पाण्यात अडकलेल्या वृद्ध महिलेला जीवाची पर्वा न करता वाचवण्याचं धाडस चीनमधल्या हेबै प्रांतातल्या तरुणानं केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

५४ वर्षीय शी ली यांना नदीत पडलेली एक महिला दिसली. कुठलाही विचार न करता शी ली यांनी नदीकडे धाव घेत हातानच गोठलेला बर्फ फोडण्याचा प्रयत्न केला. 


विशेष म्हणजे कमालीच्या थंडीमुळे नदीत पडलेली वृद्ध महिलाही गारठून गेली होती... आणि कोणतीही हालचाल करण्याचंही तिच्यात त्राण उरलं नव्हतं. परंतु, ली यांनी आपले प्राण धोक्यात घालून सुखरुपपणे वृद्धेला बाहेर काढून तिचे प्राण वाचवले.