Trending News Today In Marathi: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आलेली एक पोस्ट व्हायरल होत आहे. एका महिलेने पोम्पेई येथील प्राचीन स्थळावरुन चोरलेले तीन दगड पुन्हा परत केले आहेत. तर महिलिने दावा केला आहे की, हे दगड शापित असून परवानगी न घेता या दगडांना हात लावला व येथून घेऊन गेली या कृत्यासाठी तिने माफी मागितली आहे. Gabriel Zuchtriegel नावाच्या अकाउंटवरुन ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये दगड आणि एक चिठ्ठीचा फोटोही शेअर करण्यात आला आहे. या अकाउंटनुसार, गॅब्रिअलला इटलीच्या पोम्पेईच्या पुरातत्व पार्कचा इनचार्ज आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, हि चिठ्ठी पाठवणाऱ्या अज्ञात माणसा प्यूमाइस दगड पोम्पेई पोहोचले आहेत. पुढील भविष्यासाठी शुभेच्छा. या पोस्टला आत्तापर्यंत 50 हजाराहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर जवळपास 400 लोकांनी लाइक केले आहे. तर मोठ्या संख्येने लोक या पोस्टवर लाइक करत प्रतिक्रिया देत आहेत. 


एका युजरने कमेंटमध्ये लिहलं आहे की, लोकांना असं वाटतं की हवाईतील ज्लालामुखीचे दगडांना शाप मिळाला आहे. मात्र, सत्य हे आहे की नॅशनल पार्कमधून काहीही चोरणे बेकायदेशीर आहे. यासाठी टूर गाइड आणि पार्क रेंजर्स लोकांना या प्राचीन चिन्हांना घेऊन न जाण्यासाठी असं सांगावे लागते. तर, एका युजर्सने म्हटलं आहे की, कोणत्याही प्राचीन स्थळातून चोरी करणे गुन्हा आहे.



दरम्यान, ज्या महिलेने येथून तीन दगड चोरली होती ती तिने पुन्हा परत केली आहे. त्याचबरोबर एक चिठ्ठीही लिहली आहे. यात तिने म्हटलं आहे की, हा खरंच शाप आहे की अन्य काय मला माहिती नाही. मला खरंच हे देखील माहिती नाही की मी ते दगड तिथेून चोरी करायला हवे होते का? मला एका वर्षातच ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे समजले. मी खूप तरुण आणि निरोगी आहे. डॉक्टर म्हणाले की बॅड लकमुळं झाले. मी माझ्या चुकीची माफी मागते.


दरम्यान, पोम्पेई वर्ड हेरिटेज साइट म्हणून युनेस्कोला मान्यता देण्यात आले आहे. इटली येथील कॅम्पानिया क्षेत्र येथे आहे. 79 इसवी सनात माउंट वेसुवियस येथे झालेल्या विस्फोटामुळं समृद्ध रोमन शहर उद्ध्वस्त झाले होते. युनेस्कोच्या वेबसाइटनुसार, हे जगातील एकमात्र पुरातत्व स्थळ आहे हे प्राचीन रोमन शहराचे संपूर्ण चित्र दर्शवतात.