Woman Slips Falls To Death Moments After Engagement: वायव्य तुर्कीमधील पोलेंट केप येथे एक विचित्र अपघात घडला आहे. या अपघातामुळे क्षणभरात होत्याचं नव्हतं झालं. 'न्यूयॉर्क पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, या दुर्घटनेमध्ये 39 वर्षीय येसिम डेमिर नावाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे येसिमची एग्नेजमेंट झाल्यानंतर काही वेळातच ती 100 फूट खोल दरीमध्ये पडली आणि यातच तिचा मृत्यू झाला.


मोठी किंकाळी ऐकू आली अन्...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

6 जुलै रोजी येसिमने तिचा प्रियकर निजामेटिन गुरसुबरोबर एग्नेज झाल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी कॅनाक्कलेमधील पोलेंट केप येथील डोंगरकड्यावर गेले होते. त्याचवेळी हा विचित्र अपघात घडला. यामध्ये येसिम थेट दरीत कोसळली. समोर आलेल्या माहितीनुसार एग्नेजमेंटच्या कार्यक्रमानंतर सोहळ्याच्या केंद्रस्थानी असलेलं येसिम आणि निजामेटिन यांच्याबरोबर काही मित्र या डोंगरकड्यावर गेले होते. सर्वजण या ठिकाणी ड्रिंक्स आणि जेवणाचा आनंद घेत होते. काही कारणानिमित्त निजामेटिन आपल्या कारजवळ जाऊन कारमध्ये काहीतरी शोधत असतानाच त्याला एक मोठी किंकाळी ऐकू आली.


45 मिनिटांमध्ये निधन


निजामेटिन आवाजाच्या दिशेनं धावला असता काही वेळापूर्वीच जिच्याबरोबर तो एग्नेज झाला होता ती येसिम दरीत पडल्याचं त्याला समजलं. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 100 फूट खोल दरीमध्ये पडल्यानंतरही येसिम बचावली होती. मात्र तिला गंभीर दुखापत झाली होती. रुग्णालयामध्ये दाखल करुन तिच्यावर उपचार सुरु असतानाच दाखल केल्यानंतर 45 मिनिटांनंतर तिचं निधन झालं.


आम्ही मद्यपान केलं होतं


निजामेटिनने या दुर्घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. "आम्ही ते ठिकाणी यासाठी निवडलं होतं कारण ती फारच रोमँटिक जागा आहे. आमच्या एग्नेजमेंटचा रोमँटिक क्षण कायम लक्षात रहावा म्हणून आम्ही या दरीच्या बाजूची जागा निवडली होती. आम्ही काही प्रमाणात मद्यपान केलं होतं. सर्वकाही अगदी क्षणात घडलं. तिचा बॅलेन्स गेला आणि ती दरीमध्ये पडली," असं निजामेटिन म्हणाला. येसिमच्या मित्रांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. "हे असं ठिकाण आहे जिथे अनेकजण सूर्यस्त पाहण्यासाठी येतात. येथील रस्ते तसे खराब आहेत. तसेच डोंगरकड्यांवर कठडेही नाहीत. त्यामुळे इथे अधिक सावध रहाणं आवश्यक आहे," असं येसिमच्या मित्रांनी म्हटलं आहे. पोलिसांनी सध्या या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. साक्षीदारांची साक्ष नोंदवून घेण्याबरोबरच नेमकं काय घडलं याची माहितीही पोलीस घेत आहेत. या घटनेमागे घातपात तर नाही ना या दृष्टीकोनातूनही तपास केला जात आहे.