Woman Buried By Husband Save Her Life By Apple Watch: सध्या तंत्रज्ञानाचं युग असून एकापेक्षा एक सरस गॅझेट्स बाजारात येत आहेत. स्मार्टफोनसोबत स्मार्टवॉचचं युग आहे. आरोग्यविषयक अपडेटसाठी स्मार्टवॉचना पसंती दिली आहे. त्याच अ‍ॅपल वॉचची गोष्टच न्यारी आहे. वॉच महागडं असलं तरी त्यातील फीचर्स जबरदस्त आहेत. अ‍ॅपल वॉचमुळे एका महिलेचं प्राण वाचले असं तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. अ‍ॅपल वॉचमुळे जमिनीत जिवंत गाडलेल्या महिलेला आपले प्राण वाचवता आले. अ‍ॅपल वॉचमधील फॉल डिटेक्शन फीचरमुळे महिलेचा जीव वाचला आहे. 42 वर्षीय यंग सौक एनला सिएटलपासून 60 मैल लांब असलेल्या एका कबरीत गाडलं होतं. ही घटना वॉशिंग्टनमध्ये घडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी एका वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार पतीने महिलेवर चाकुने वार करून डक्ट टेपनं तोंड बंद केलं होतं. त्याचबरोबर कबरीत पुरलं होतं. कबरीत पुरण्यापूर्वी त्याने महिलेला घरातच मारहाण केली. तिचा गळा, तोंड आणि पायाच्या घोट्याभोवती डक्ट टेप गुंडाळलेलं आणि कबर खोदण्यासाठी गेला. तो बाहेर गेल्याचं पाहताच तिने अ‍ॅपल वॉचवरून 911 क्रमांक डायल केला. अ‍ॅपल वॉचने तिच्या 20 वर्षांच्या मुलीलाही आपत्कालीन मदतीची सूचना पाठवली. मात्र, पतीला काही वेळातच घड्याळाची माहिती मिळाली आणि त्याने हातोड्याने तोडले आणि तिला जमिनीच.पोलिसांना मेसेज मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी त्या महिलेला शोधून बाहेर काढलं. 


Video: फ्लाइटमध्ये महिला कर्मचाऱ्याला दिसली शिक्षिका, मग काय झालं तुम्हीच पाहा


महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी पंचनाम्यात म्हंटलं आहे. तिचा गळा, तोंड आणि पायाच्या घोट्याभोवती डक्ट टेप गुंडाळलेली होती. तिच्या पायावर, हातावर आणि डोक्यावर गंभीर जखमा होत्या. तिचे कपडे आणि केस धुळीने माखलेले होते. या प्रकरणी पोलिसांनी 53 वर्षीय चाई क्योंग याला अटक केली आहे.