मॉस्को: पश्चिम रशियातील एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. आपल्या मित्राच्या १३ वर्षीय मुलीचे कौमार्य विकण्याचा प्रयत्न केल्याचा या महिलेवर आरोप आहे. कौमार्याच्या बदल्यात लाखो रूपये मिळविण्याच्या उद्देशाने मुलीला एका इसमाकडे रात्रभर पाठविण्याची योजना या महिलेने बनवली होती. मात्र, तिचा हा कट पोलिसांनी वेळीच उधळला. एलीना कुकनोवा, असे नाव असलेल्या या महिलेवरचा आरोप सिद्ध झाला असून, तिला साडेतीन वर्षांची सजा ठोठावण्यात आली आहे. दरम्यान, एलीनाने म्हटले आहे की, पीडित मुलीची आई इरीना ग्लेडकिख हिनेच मला असे करण्यास सांगितले होते.


ग्राहकाचा ऑनलाईनही शोध...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेल्याबिंस्क शहरात राहणाऱ्या इरीना ग्लेडकिख हिने आपल्या मुलीच्या कौमार्यविक्रीसाठी ऑनलाईन ग्राहक शोधायला सांगितले होते. तसेच, या अल्पवयीन मुलीला एका अरबी असमाकडे पाठवण्यासंबंधी व्यवहारही झाला होता. या बदल्यात अरबी इसामाकडून १८,००० पाऊंड (सुमारे १६ लाख रूपये) मिळणार होते. दरम्यान, मॉस्कोतून त्याहीपेक्षा मोठी ऑफर आल्याने महिलेने अरबासोबतचा व्यवहार रद्द केला. मॉस्कोतून ऑफर देणारा व्यक्ती हा वास्तवात पोलीस होता.


बनाव रचून पोलिसाने केला पर्दाफाश


दरम्यान, अल्पवयीन मुलीचे कौमार्य असे ऑनलाईन विकणे ही कल्पनाच पोलिसाला भयानक वाटली. त्यामुळे संबंधीत महिलेला अटक करण्यासाठी त्याने स्वत:च ग्राहक बनून मुलीचे कौमार्य विकत घेत असल्याचा बनाव रचला. पोलिसाने आरोपी महिलेसोबत मॉस्कोतील एका हॉटेलमध्ये व्यवहार केला आणि तिला नकली पैसे दिले. पोलिसाला जेव्हा मुलगी मिळाली तेव्हा त्याने महिलेला अटक केली.