न्यूयॉर्क, अमेरिका : 'ऊपरवाला जब भी देता है छप्पर फाड के देता है' ही म्हण तुम्ही एव्हाना ऐकलीच असेल... पण, अमेरिकेच्या मेरिलँडमध्ये राहणाऱ्या वेनेसा वार्डनं ही म्हण प्रत्यक्षात अनुभवलीय. वेनेसा कोबी विकत घेण्यासाठी जवळच्याच बाजारात गेली होती... आणि अवघ्या २५ मिनिटांच्या आत ती करोडोंची मालकीण बनली होती. वेनेसानं रस्त्यातच एक लॉटरीचं तिकिट खरेदी केलं... जणू ती काही आपल्या नशिबाची परिक्षाच घेत होती... तिकीट घेतलं आणि ती घरी परतली... हे तिकीट स्क्रॅच केल्यानंतर तिला धक्काच बसला. या तिकीटामुळे वेनेसाला २ लाख २५ हजार डॉलर्सची लॉटरी लागली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही लॉटरी जिंकल्यानंतर वेनेसा खुपच खुश आहे. आपल्या वडिलांनी आपल्याला भाजी विकत घेण्यासाठी बाजारात धाडलं होतं... इथंच स्पिन स्क्रॅच ऑफ तिकीट पाहिलं आणि सहजच हे तिकीट खरेदी केलं.. पण या लॉटरीमुळे आपलं नशिबचं बदलल्याची प्रतिक्रिया वेनेसानं व्यक्त केलीय.


यानंतर वेनेसानं सर्वात अगोदर 'वर्जिनिया लॉटरी'ला फोन केला आणि याबद्दल सूचना केली. ही रक्कम निवृत्तीनंतर वापरता यावी, म्हणून आपण सुरक्षित ठेवणार असल्याचं वेनेसानं म्हटलंय. शिवाय डिज्स्ने वर्ल्ड फिरण्याची आपलं अपूर्ण स्वप्नंही वेनेसाला पूर्ण करायचंय. 


मिळालेल्या माहितीनुसार, वेनेसाच्या अगोदर जुलै महिन्यातही एका तरुणाला लॉटरी लागली होती. परंतु, या तरुणाबद्दल अधिक माहिती मिळू शकली नव्हती.