जकार्ता : इंडोनेशिया या मुस्लिम देशात एका विवाहित महिलेला प्रियकरासोबत संबंध ठेवल्याबद्दल भयानक शिक्षा देण्यात आली. लोकांच्या उपस्थितीत महिलेला इतके चाबकाचे फटके मारण्यात आले की ती बेशुद्ध झाली. महिला वेदना सहन करत राहिली, पण शिक्षा पूर्ण होईपर्यंत तिला मारले जात राहिले. हा सर्व प्रकार पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरिया कायद्यानुसार शिक्षा
'डेली स्टार'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, इंडोनेशियातील बांदा आचे शहरात एका महिलेला प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल क्रूरपणे शिक्षा देण्यात आली. महिलेच्या साथीदारालाही मारहाण करण्यात आली. शरिया कायद्यानुसार दिलेली ही शिक्षा पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देण्यात आली. 


एका मागून एक चाबकाचे फटके
शिक्षेपूर्वी, महिलेने पांढरा इस्लामिक पोशाख परिधान केला होता. यानंतर तिला जमिनीवर बसण्यास सांगितले आणि त्यानंतर दुसऱ्या महिलेने तिला एकामागून एक 17 चाबके फेटके मारले. यादरम्यान पीडिता आरडाओरडा करत राहिली, मात्र कोणीही तिच्या मदतीला आले नाही. वेदनांमुळे ती महिला काही काळ बेशुद्धही झाली होती.


सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही
आचे हा एकमेव इंडोनेशियन प्रांत आहे ज्याठिकाणी शरिया कायद्याचे पालन केले जाते. या कायद्यात अनोळखी पुरूषासोबत आणि समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी क्रूर शिक्षेची तरतूद आहे. समलैंगिकतेबद्दल दोषी आढळल्यास 150 चाबकाचे फटके सार्वजनिकरित्या मारले जातात. अनेक वेळा शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच लोक हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. 2018 साली, स्थानिक सरकारने सांगितले की ते सार्वजनिकपणे शिक्षेची प्रथा बंद करण्यात येणार होती, परंतु आजपर्यंत असे झाले नाही.