बाटलीवरचा बॅलन्स महिलेच्या अंगाशी आला, काय घडलं पाहा व्हिडीओ?
बाटली उलटली महिला पडली, पाहा जबरदस्त व्हिडीओ
मुंबई: योग आणि स्टंट दोन्ही एकसाथ करण्याची हौस महिलेला चांगलीच महागात पडली. बाटलीवरचा बॅलन्स सुटला आणि योग करणं महिलेच्या अंगाशी आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओनं चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
वेगवेगळे प्रयोग करण्याच्या नादान महिला थेट वरून खाली कोसळली आहे. या घटनेत महिलेला दुखापत झाली आहे. ट्वीटरवर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. योगचा सराव करत असताना दोन बाटल्यांवर ठेवलेल्या पायाचा तोल बिघडतो आणि महिला खाली कोसळते. या बाचल्या प्लॅस्टिकच्या नाहीत तर काचेच्या आहेत.
होल्ड माय बियर नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 5 सेकंदाचा हा व्हिडीओ पाहून काही युझर्सना हसू आलं तर काहींनी या महिलेवर दया आली. तर काही युझर्सना ही झालेली फजिती पाहून हसू आवरत नव्हतं.
हा व्हिडीओ 43 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. काही लोकांनी यावर हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. तर काहींनी या व्हिडीओवर जबरदस्त कमेंट्स केल्या आहेत.