मुंबई: जगातील प्रत्येक व्यक्ती पैसे कमावण्यासाठी धडपड करत असते. फक्त अन्न, वस्त्र, निवारा नाही तर एक लक्झरी आयुष्य जगण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. पण हेच आयुष्य जगण्यासाठी महिलेनं अजब आयडिया वापरली आहे. 
 
 आतापर्यंत आपण मांजर आणि श्वानांचे लाड पुरवताना पाहिले असतील. त्यांना हौशीनं आयस्क्रीम, केकसारखे पदार्थ खायला दिले असतील. मांजराचे खायचे म्हणजेच कॅटफूडसारख्या गोष्टी माणसांनी खाल्याचं कधी ऐकलं आहे का? ऐकून थोडं आश्चर्य वाटेल पण होय. असं खरंच घडलं आहे. कोट्यवधी रुपये कमवणारी महिला जेवण किंवा खाण्याचे पदार्थ सोडून थेट कॅटफूडवर आली आहे. 
 
 या कोट्यवधी कमवणाऱ्या महिलेनं कॅटफूड खायला सुरुवात केली आहे. ही महिला रोज जेवण, नाश्त्याऐवजी मांजरीचं खाणं म्हणजे कॅटफूड खाते. ही गोष्ट जेव्हा सोशल मीडियावर आली तेव्हा जगभरात या महिलेची चर्चा होऊ लागली आहे. ही महिला असं का करत असेल असा एकच प्रश्न सर्वांना पडला आहे.
 
 अमेरिकेतील लास वेगस इथे एमी एलिजाबेथ नावाची कोट्यवधी रुपयांची मालक असलेली महिला राहाते. एलिजाबेथ यांनी तिथल्या एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना अजब गोष्ट सांगितली. ही गोष्ट ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. एलिजाबेथ म्हणाल्या मी वायफळ खर्च करत नाही. याशिवाय मी वाण्याचं बिल कमी करण्यासाठी मांजरीचं जेवण खाते आणि दुसऱ्यांनाही तेच देते. 
 
 त्यांनी केलेला दावा ऐकून एक क्षण वाटेल एलिजाबेथ हालाकीचं जीवन जगत असतील किंवा गरिबीचं वातावरण असेल. मात्र नाही हाच मोठा गैरसमज आहे. एलिजाबेथ या 38 कोटी रुपयांच्या मालकीण आहेत. केवळ पैसे वाचवण्यासाठी त्या आणि त्यांची मांजर दोघंही कॅडफूड खात आहेत. त्या जवळपास 1 कोटींची बचत करत असल्याचं देखील या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं. 
 
 50 वर्षी एमी एलिजाबेथ या आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांनाही हेच नाश्ता आणि जेवण म्हणून देतात. त्यांच्या या रुटीनमुळे त्यांचे जवळपास 80 डॉलरची बचत होत आहे. याशिवाय त्या 17 वर्ष जुन्या गाडीतून आजही प्रवास करत आहेत.