ब्रिटन : गरोदर महिलेला प्रेग्नेंसीबाबत अनेक लक्षणं दिसून येतात. शिवाय यावेळी महिलेच्या शरीरात अनेक बदलंही होतात. मात्र एका ब्रिटीश महिलेने खुलासा केला आहे की, तिला तिच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मापर्यंत तिच्या गर्भधारणेची अजिबात कल्पना नव्हती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एमा फिट्झसिमॉन्स असं या महिलेचं नाव आहे. ही महिला पोटदुखीच्या तक्रारीनंतर मंगळवारी पोर्ट मॅक्वेरी रूग्णालयात दाखल झाली होती. त्यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला सांगितले की तिला पोटदुखीचा त्रास नसून प्रसूती वेदना होतायत आहेत. हे ऐकून महिलेला आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी डॉक्टरांना पुन्हा तपासण्यास सांगितलं.


एम्माने दोन वर्षांपूर्वी एका मुलाला जन्म दिला होता. एम्मा तिच्या दोन्ही गर्भधारणेबद्दल म्हणाली, "मला विल्यमबद्दल गरोदरपणाच्या 11 व्या आठवड्यात कळलं आणि मी 22 व्या आठवड्यापर्यंत दररोज आजारी पडायची त्यामुळे ही एक वेगळीच भावना होती."


एम्मा म्हणाली, डॉक्टर म्हणाले की, मला दुसऱ्या गर्भधारणेबद्दल माहिती मिळू शकली नाही कारण असं असू शकतं की गर्भातील मूल नेहमी पाठीवर बसलेलं असेल आणि प्लेसेंटा त्याच्या समोर आलं असेल. त्यामुळे मला त्याची कोणतीही हालचाल जाणवली नाही.


एम्माने सांगितले की, ती गरोदरपणातही जुने कपडे घालायची. ना तिचं वजन वाढलं ना तिच्या शरीराच्या आकारात कोणताही बदल झाला होता.


काही अभ्यासांनी असा अंदाज लावला आहे की 400 किंवा 500 पैकी एक महिला जेव्हा त्यांच्या गर्भधारणेच्या 20 व्या आठवड्यात असेल तेव्हा त्यांची गर्भधारणेची कल्पना येते.


डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, ज्या महिलांना मासिक पाळी वेळेवर येत नाही, ज्यांना स्थूलतेचा त्रास असतो किंवा ज्या महिला मानसिक आजाराने ग्रस्त असतात, त्यांना लेबर पेन होतं मात्र त्यांना गर्भधारणेविषयी कल्पना नसते.