मुंबई : कोणाचं नशीब कोणासाठी काय घेऊन येईल हे काही सांगता येत नाही. काहींच नशीब असं काही फळफळतं की बस रे बस, तर काही लोकांनी कितीही मेहनत केली तरी त्यांचे नशीब त्यांना साथ देत नाहीत. मिशिगनमधील एका महिलेचं नशीब असं काही फळफळलं की, ज्याचा तिने स्वप्नात देखील विचार केला नसावा. या 69 वर्षीय महिलेने तिचे नशीब आजमवण्यासाठी पहिल्यांदा लॉटरीचे तिकीट काढलं आणि तिचं नशीबच फळफळलं. कारण या महिलेला 250 हजार डॉलरची म्हणजेच जवळजवळ 2 कोटी रुपयांची लॉटरी लागली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुनरो काउंटी नावाच्या या महिलेनं सांगितलं की, तिने ही पहिल्यांदा लॉटरी काढली आणि तिला 1 कोटी 86 लाख 6 हजार 875 रुपयांची लॉटरी लागली आहे.


काउंटीने सांगितले की, "जेव्हा आम्ही स्टोअरवर काम करायचो तेव्हा माझ्या नवऱ्याने केनो तिकीट काढणे बंद केलं होतं. मी याआधी कधीही लॉटरी काढली नव्हती, परंतु माझ्याकडे काही डॉलर होते, त्यामुळे मी एक तिकीट विकत घेण्याचा विचार केला."


महिलेने सांगितले की, ही तिकीट घेण्यासाठी तिने तिची जन्म तारीख, मुलांचे वय याच्याशी संबंधीत नंबर असलेलं लॉटरीचं तिकीट विकत घेतलं. त्यानंतर जेव्हा तिच्या नवऱ्यानं तिला सांगितलं की, तिला ही तिकीट लागली आहे तेव्हा या महिलेला धक्का बसला. तिला यावर विश्वासच बसत नव्हता. त्यामुळे तिने स्वत:हून हे नंबर पडताळले आणि खात्री करुन घेतली. तेव्हा तिला यावर विश्वास बसला.


महिला म्हणाली की, तिने स्वप्नात देखील असा विचार केला नव्हता. लॉटरी लागल्यानंतर आता ही महिली खूप खूश आहे.