न्यूवार्क : अमेरिकेतल्या न्यूवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगळीवेगळी घटना घडली आहे. विमानातून प्रवास करण्यासाठी एक महिला चक्क तिच्या मोराला घेऊन विमानतळावर आली होती. पण महिला आणि मोराला विमानानं प्रवास करण्याची परवानगी नाकारण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या महिलेनं स्वत:चं आणि मोराचं तिकीट काढलं होतं तरीही त्यांना विमानानं प्रवास करता आला नाही. विमानतळावरचा मोराचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत.


पक्षी आणि प्राण्यांबरोबरची प्रवाशांची भावनिक जवळीक आम्ही समजू शकतो पण वजन, आकार आणि इतर नियमांमध्ये मोर बसत नाही. विमानातल्या सहप्रवाशांना सर्वोत्तम सुविधा मिळाव्यात तसंच त्यांना कोणताही त्रास होऊ नये हा आमचा उद्देश आहे, अशी प्रतिक्रिया युनायटेड एअरलाईन्सनं दिली आहे.


१ मार्चपासून अशा प्रवाशांना त्यांच्या प्राणी-पक्ष्यांना विमानातून न्यायचं असेल तर सगळी कागदपत्र दोन दिवस आधी सबमिट करावी लागणार आहेत. सध्या अशाप्रकारे प्राण्यांना घेऊन प्रवास करण्यासाठी प्रवाशांना कागदपत्र, ४८ तास आधी पूर्वसूचना आणि डॉक्टरांचं सर्टिफिकेट देणं बंधनकारक आहे, अशी माहिती एअरलाईन कंपनीनं दिली आहे. 


मोर आला विमानतळावर, पाहा व्हिडिओ