अफगाणिस्तानातील ही `वाघीण` कोण आहे? जिने तालिबान्यांनाही दिलं आव्हान
2001 मध्ये तालिबानचे राज्य संपल्यानंतरही लोकांचा दृष्टिकोन थोडा बदलला आहे.
काबूल : अफगाणिस्तानात सध्या खूपच गोंधळ सुरू आहे. अमेरिकन सैन्याने आपल्या देशी परत जाण्यास सुरूवात केली आहे, तर काही भागांमध्यील परदेशी सैन्य आपल्या देशात निघून गेले आहेत. त्याच वेळी, अफगाणिस्तानमधून येणारी चित्रे आणि जे दावे केले जात आहेत त्यानुसार आणि तालिबानच्या वक्तव्यानुसार, या ठिकाणचे अनेक भाग तालिबानच्या ताब्यात घेण्यात आले आहेत. या सगळ्याच्या दरम्यान अफगाणिस्तानातील एका महिलेने तालिबानला आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे.
तुम्हाला हे जाणून देखील आश्चर्य वाटेल की, जिथे तालिबानने स्त्रियांना भीतीच्या छायेखाली राहण्यास भाग पाडले, तिथे ही महिला कोण आहे जी यालोकांना शौर्याने सामोरे जाण्यास तयार आहे.
तर ही महिला सलीमा माजरी आहे आणि ती उत्तर अफगाणिस्तानच्या बल्ख प्रांतातील मजार-ए-शरीफपासून सुमारे एक तासाच्या अंतरावर रहाते.
तालिबानच्या काळात महिला आणि मुलींच्या शिक्षण, लेखन आणि नोकऱ्यांवर बंदी होती.
2001 मध्ये तालिबानचे राज्य संपल्यानंतरही लोकांचा दृष्टिकोन थोडा बदलला आहे. माजारी म्हणतात, 'तालिबान हे तेच आहेत जे मानवी हक्क पायदळी तुडवतात. सामाजिकदृष्ट्या हे लोकं महिला नेत्यांना स्वीकारण्यास सक्षम नाहीत."
शारिया परंपरेनुसार तालिबानने महिलांना शांती आणि सन्मान देण्याचे आश्वासन दिले होते, पण थोड्याच वेळात, एक व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे ज्यामध्ये दहशतवादी गटाने सलीमा मजारीला पकडले आहे. ती अफगाणिस्तानच्या महिला राज्यपालांपैकी एक आहे, तिने एकदा दडपशाहीविरुद्ध लढा दिला होता. बलख प्रांतातील त्यांच्या समर्थकांचा असा दावा आहे की, तालिबानला प्रतिकार करणाऱ्या गटासमोर उदाहरण उभे करण्यासाठी तालिबान सलीमा मजारी यांना लवकरच फाशी दिली जाऊ शकते.
तालिबान्यांच्या छळाच्या भीतीने राष्ट्रपति अशरफ गनी आणि अफगाणिस्तानचे वरिष्ठ नेते देश सोडून पळून गेले, त्या वेळी सलीमा मजारी यांनी बाल्ख प्रांतात राहण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत तालिबानने त्यांचा चाहर किंट जिल्हा ताब्यात घेतला नाही. ते म्हणाले की, जेव्हा बंडखोरांनी संपूर्ण देशावर हल्ला केला, तेव्हा सलिमा मजारी यांना ताब्यात घेण्यात आले.
माजरी, हजारा समाजाची शूर महिला
माजरी ही हजारा समाजातून येते आणि या समाजातील बहुतेक लोक शिया आहेत. ज्यांना तालिबान मुळीच आवडत नाही. कारण त्यांना नेहमीच तालिबान आणि इस्लामिक स्टेटच्या लढाऊंनी टार्गेट केलं आहे.
मे महिन्यातच त्याने राजधानीतील एका शाळेवर हल्ला केला, ज्यामुळे 80 मुलींचा मृत्यू झाला. माजरीच्या अधिपत्याखालील सुमारे निम्मा जिल्हा यापूर्वीच तालिबानच्या ताब्यात आला आहे. आता ती उरलेला भाग वाचवण्यासाठी सतत काम करत आहे. शेतकरी, मेंढपाळ आणि मजुरांसह शेकडो स्थानिक लोक त्यांच्या या मिशनचा एक भाग बनले आहेत आणि तालिबानला आपल्या भागात शिरु न देण्यासाठी प्रयत्न करत आहे.
लोक जमीन विकून शस्त्रे खरेदी करतात
माजरी म्हणतात, “आमच्या लोकांकडे बंदुका नव्हत्या, पण त्यांनी त्यांच्या गाई, मेंढ्या आणि अगदी जमीन विकून शस्त्रे विकत घेतली. ते रात्रंदिवस सर्वत्र तैनात असतात, परंतु ना त्यांना श्रेय मिळत आहे, ना पगार.''
जिल्हा पोलीस प्रमुख सय्यद नजीर यांचा असा विश्वास आहे की, लोकांच्या प्रतिकारामुळे तालिबान हा जिल्हा आतापर्यंत काबीज करू शकला नाही. स्थानिक लोकांनी वृत्तसंस्था एएफपीला सांगितले, 'आमची कामगिरी लोकांच्या सहकार्याच्या आधारावर आहे.'
माजरीने आतापर्यंत 600 जणांची भरती केली आहे, जे लढाई दरम्यान सैन्य आणि सुरक्षा दलांची जागा घेत आहेत. त्यापैकी 53 वर्षीय सय्यद मुनावर आहेत, ज्यांनी आपल्या आयुष्यात 20 वर्ष शेती केल्यानंतर पहिल्यांदा हातात शस्त्र घेतले आहे.
मुनावर म्हणाले, "जोपर्यंत त्यांना आमच्यावर हल्ला केला नव्हता तोपर्यंत आम्ही फक्त साधे कारागीर आणि मजूर होतो. त्यांनी आमच्या बाजूच्या परिसरावर हल्ला केला ज्यामुळे आमच्यावर बातात शस्त्र आणि दारु गोळा घेण्याची वेळ आली."
चारकिंतमधील गावातील लोकांचे मन अजूनही तालिबानच्या वाईट आठवणींनी भरलेले आहे. त्यांना अजूनही तो पूर्वीचा तालिबान आणि त्याचे नियम, क्रुरता आठवते. माजरी यांना माहीत आहे की, जर ते परत आले तर ते कधीही एका महिलेचे नेतृत्व स्वीकारणार नाहीत. ज्यामुळे शिक्षण आणि लेखनासाठी महिलांच्या संधी कमी केल्या जातील आणि तरुणांना नोकऱ्या मिळणार नाहीत.