मुंबई : हिंदू धर्मात, जिथे मुलाच्या जन्मानंतर काही महिने मुंडण करण्याची प्रथा आहे, तिथे एक धर्म असा देखील आहे, ज्यामध्ये   मुलींना बालपणापासून शेवटच्या श्वासापर्यंत केस कापण्याची परवानगी नाही.एवढेच नाही तर ते आपल्या शरीराचे केसही (Body hair) काढू शकत नाहीत. नेमकं हे कोणत्या धर्मात होतं व महिलांवर (women) आणखीण कोणती बंधने आहेत, ते जाणून घेऊयात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केस कापणे लाजिरवाणे मानतात
अॅनाबॅप्टिझम ख्रिश्चन चर्चशी संबंधित अमीश समाजातील स्त्रिया त्यांच्या केसांबाबत (Women hair)  बायबलच्या नियमांचे पालन करतात. यानुसार त्यांना केस कापण्याची परवानगी नाही. यासोबतच महिलांना केसांना (Women hair)  अंबाड्यात बांधून कपड्याने झाकून ठेवावे लागते.ती तिचे केस फक्त घरातच उघडू शकते. जर महिलांनी केस कापले तर ते अत्यंत लज्जास्पद मानले जाते.


शरीरावरील केस
या धर्मातील महिला आपल्या शरीरावरील केसही (Women body hair) काढू शकत नाहीत. त्यामुळे आपलं शरीर झाकण्यासाठी या महिला बहुतेकदा लांब बाही असलेले आणि त्यांची लांबी तळव्यापर्यंतचे कपडे घालतात. 


केस धुण्यासाठीचा नियम
केस धुण्यासाठी (hair wash) महिलांसाठी कोणतेही विशिष्ट नियम नाहीत. म्हणजेच ते कोणत्याही पद्धतीचा वापर करू शकतात. आजच्या अमिश स्त्रिया इतर महिलांप्रमाणेच केस धुण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले शाम्पू वापरतात.


परफ्य़ुम वापरण्याची परवानगी 
महिलांना काखेतले केस कापायचीही परवानगी नाही आहे. त्यामुळे जास्त घाम आल्यास खुप दुर्गंधी येते. त्यामुळे या महिलांना डिओडोरंट वापरण्याची परवानगी आहे. जर महिलेने दाढी केली तर तिला शिक्षा होऊ शकते.


हे सर्व नियम खुपच कठोर आहेत, जे समाजातील महिलांनी पाळले पाहिजेत. मात्र, कालांतराने त्यांच्यात काहीशी शिथिलता आली आहे. 


(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती इंटरनेटवर आधारित आहे. झी 24 तास त्याच्या अचूकतेची पुष्टी करत नाही.)