Age Gap Relationships: प्रेम म्हणजे प्रेम असतं! मुलाच्या वयाच्या तरूणासोबत जुळलं प्रेम
मुलाच्या वयापेक्षा 2 वर्ष मोठ्या तरूणासोबत महिलेच जुळलं प्रेम, Love Story एकूण धक्का बसेल
नवी दिल्ली : प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, अस म्हणतात मात्र ही घटना याला अपवाद ठरली आहे. कारण या घटनेत एका महिलेचं मुलाच्या वयाच्या तरूणासोबत प्रेम जूळले (Love Story) आहेत. दोघांच्या वयात जमीन आसमानाचा फरक आहे, मात्र मन जुळली म्हणून त्यांच्यात प्रेमही जुळलं आहे. सध्या त्यांच्या या अनोखी लव्हस्टोरीची (Love Story) चर्चा आहे.
लव्हस्टोरी काय?
अमेरिकेत राहणाऱ्या एका कपलची खुप चर्चा रंगली आहे. या कपलमध्ये असलेल्या वयाच्या अंतरामुळे ही चर्चा रंगली आहे. या लव्हस्टोरीत (Love Story) महिला ही 48 वर्षीय शिक्षिका आहे, तिचे नाव रशेल आहे. या महिलेचे आपल्याच मुलाच्या वयाच्या तरूणासोबत प्रेम जुळलं आहे. या तरूणाचे नाव अॅलेक्स असे आहे. सध्या या दोघांच्या लव्हस्टोरीची चर्चा रंगली आहे.
वयात किती अंतर आहे?
रशेलचे वय 48 आहे, तर तिच्या बॉयफ्रेंडच (boyfriend) वय 25 आहे. दोघांच्या वयात साधारण 23 वर्षांचा फरक आहे. तर महिलेचा मोठा मुलगा हा 23 वर्षाचा आहेत. त्यामुळे मुलापेक्षा दोन वर्ष मोठ्या तरूणासोबत महिलेचे प्रेमसंबंध जुळल्याचे बोलले जात आहे.
मुलाच्या आग्रहानंतर रिलेशनशिपची माहिती दिली
रशेलने सांगितले की, तिला दोन मुले आहेत. मोठा मुलगा बेन 23 वर्षांचा आहे तर धाकटा मुलगा जॉर्ज 19 वर्षांचा आहे. या नात्याबद्दल बोलताना रशेल म्हणाली की, सुरुवातीला माझे नवे नाते मुलं स्वीकारू शकत नव्हती. मुलांच्या मित्रांनी त्यांना माझा अॅलेक्ससोबतचा व्हिडिओ पाठवला होता. या घटनेनंतर ते खुप दुखावले होते. यानंतर मुलांनीच मला हे नाते जगासमोर आणण्यास सांगितले होते.
अशी सुरु झाली लव्ह स्टोरी
रशेल आणि अॅलेक्सची लव्ह स्टोरी (Love Story) दोन वर्षांपूर्वी एका डेटिंग अॅपवरून (Dating App) सुरु झाली होती. रशेलने सांगितले की, तिने पहिल्यांदाच अॅलेक्सला डेटिंग अॅपवर पाहिले होते. त्यांचे नाते डिसेंबर 2020 मध्ये सुरू झाले. तिचा पतीपासून घटस्फोट झाला होता.
रॅशेलने अॅलेक्सला त्याचे वय विचारले तेव्हा तो खूपच लहान असल्यामुळे तो थक्क झाला. मात्र, त्यानंतर या जोडप्याने एकमेकांशी बोलणे आणि एकमेकांना जाणून घेण्यास सुरुवात केली. आणि नंतर मग दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळलं.
वयाच्या अंतरामुळे या जोडप्याला ट्रोलही व्हावे लागले. मात्रही तरीही या दोघांची लव्हस्टोरी (Love Story) खुप चर्चेत आहे.