Trending News In Marathi: तंत्रज्ञानाच्या या युगात सगळं काही शक्य आहे. पहिलेच्या काळात लांबच्या नातेवाईकाला पाहायचं म्हटलं तरी दिवसेंदिवस वाट पाहावी लागत होती. मात्र आता व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्या व्यक्तीला सहज पाहू शकतो. इतकंच काय तर संवादही साधू शकतात. पण जसे तंत्रज्ञानाचे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत.निष्काळजीपणामुळं मोठं नुकसान होऊ शकते. एका महिलेसोबत असाच एक प्रकार घडला आहे. झूम कॉलवरुन ही महिला तिच्या लांबच्या नातेवाईकांचे अंत्यसंस्कार सुरु असताना पाहत होती. मात्र, हे सर्व सुरू असतानाच म्हणजेच लाइव्ह स्ट्रीम सुरु असतानाच तिने कॅमेरा ऑन केला. त्यानंतर तिच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलेने लाइव्ह स्ट्रिमिंग सुरू असताना चुकून कॅमेरा ऑन केला आणि ती अंघोळीसाठी गेली. कॅमेराचा फोकसही तिच्याकडेच असल्याने मोठा अनर्थ घडला होता. खरं तर झूम कॉलची व्यवस्था ही त्या लोकांसाठी केली होती ते लोक लंडनच्या उत्तरेकडे राहत आहेत आणि त्यांना अत्यंसंस्कारासाठी येणे शक्य नाहीय. जेणेकरुन घरात बसूनही ते अत्यसंस्कार पाहू शकतील. मेट्रो युकेच्या रिपोर्टनुसार, तीन मुलांच्या वडिलांचा कॅन्सरने मृत्यू झाला होता. इतर लोकांनाही अत्यसंस्कारात सहभागी होता यावे म्हणून लाइव्ह स्ट्रिमिंग करण्यात येत होते. महिलेने देखील हा झूम कॉल अटेंड केला होता. त्यानंतर ती अंघोळीसाठी गेली. मात्र कॅमेऱ्याचा फोकस तिच्याकडे असल्याने तिला लोकांनी आंघोळ करताना पाहिलं. 


सुदैवाने, लाइव्ह स्ट्रीमिंगच्या वेळी या प्रकाराकडे कोणाचे लक्ष गेले नाही. सगळ्याचे लक्ष कार्यक्रमाकडेच होते. मात्र, त्यानंतर व्हिडिओ व्हायरल झाला अनेकांच्या व्हॉट्सअॅपवरही हा व्हिडिओ आला होता. सोशल मीडियावरही एकाने या घटनेची माहिती देत स्क्रीनशॉट शेअर केला आहे. तर, महिलेला या घटनेबद्दल काहिच माहिती नव्हती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिला आपण नेमकी काय चूक करुन बसलो हे समजले. 


अशी घटना पहिल्यांदाच घडली नसून याआधीही कित्येकदा असे प्रसंग घडला आहेत. याआधी 2021 साली कॅनडाचे खासदार विल्यम अमोसदेखील त्यांच्या सहकाऱ्यांसमोर नग्नावस्थेत दिसले होते. त्यांचा टेबलाच्या मागे उभं असलेला एक स्क्रीनशॉटदेखील शेअर झाला होता.त्यांच्या एका हातात मोबाइल होता. तर, त्याचवर्षी इस्टेट एजंट डेमियन म्लोटकोस्वी हि महिला तिच्या सहकाऱ्यांसोबत झूम कॉलवर लाइव्ह होती त्याचवेळी तिचे पती अचानक नग्नावस्थेत लाइव्ह कॅमेऱ्यासमोर आले.