Tailormade Pillow: एका डच डिझायनरने जगातील महागडी उशी तयार केली आहे. या उशीची किंमत वाचून भल्याभल्यांची झोप उडाली आहे. नेदरलँडच्या थिज व्हॅन डेर हिलस्टने ही उशी तयार केली असून आर्किटेक्चरल डायजेस्टनुसार ती 57 हजार डॉलर म्हणजेच अंदाजे 45 लाखांना विकली जात आहे. हिलस्टला ही खास उशी तयार करण्यासाठी 15 वर्षे लागली. टेलरमेड पिलो ही जगातील सर्वात खास आणि प्रगत उशी आहे. ही उशी इजिप्शियन कापूस आणि तुतीच्या रेशमापासून बनवलेली आहे. यात 24 कॅरेट सोने, हिरे आणि नीलम जडलेले आहे. उशीमध्ये भरण्यासाठी वापरलेला कापूस रोबोटिक मिलिंग मशीनमधून येतो. तसेच तिला 24 कॅरेट सोन्याचे कव्हर देण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

3D स्कॅनर वापरून एखाद्या व्यक्तीचे खांदे, डोके आणि मान यांचे अचूक परिमाण काळजीपूर्वक मोजले जातात. हाय-टेक रोबोटिक मशीन मिल्स वापरून एखाद्या व्यक्तीच्या डोक्याच्या आकाराशी जुळवून घेते. उशा बनवण्यापूर्वी, ग्राहकाच्या शरीराच्या वरच्या भागाचा आकार आणि झोपण्याची मुद्रा देखील लक्षात घेतली जाते. ही उशी नॉन-टॉक्सिक डच मेमरी फोमने भरलेली असते. तसेच कव्हर सर्व प्रकारचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन अवरोधित करते आणि निरोगी आणि सुरक्षित झोप देण्यास मदत करते. 



उशी निद्रानाश असलेल्या लोकांना शांतपणे झोपण्यास मदत करेल. पण या उशीची किंमत वाचून भल्याभल्यांची झोप उडाली आहे, हे देखील तितकंच खरं आहे.