चीनमध्ये धावणार जगातील सर्वात वेगवान ट्रेन...
सप्टेंबरमध्ये चीनमध्ये जगातील सगळ्यात वेगवान ट्रेन धावण्यास प्रारंभ होणार असल्याचे चिनी अधिकाऱ्यांनी सांगितले.
बिजिंग : सप्टेंबरमध्ये चीनमध्ये जगातील सगळ्यात वेगवान ट्रेन धावण्यास प्रारंभ होणार असल्याचे चिनी अधिकाऱ्यांनी सांगितले. ही ट्रेन बिजिंग ते शांघाय हे अंतर तासाभरात पार करेल. मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार चीनच्या रेल्वे प्रशासनाने सांगितले की, "काही यशस्वी चाचण्या केल्यानंतर 'फुक्शिंग' ही ट्रेन २१ सप्टेंबरपासून सुरु होईल. हीच वेग ताशी ३५० ते ४०० किलोमीटर इतका असेल.
अशाप्रकारच्या सात ट्रेन असतील ज्या दोन्ही शहरात १४ वेळा प्रवास करतील. म्हणजे सुमारे १,३१८ किलोमीटर प्रवास करतील. आधीच्या ट्रेनपेक्षा ही ट्रेन तासी ५० किलोमीटर अधिक वेळाने धावेल.
चीनमध्ये बनलेल्या या नव्या बुलेट ट्रेनचे वैशिष्ट्य म्हणजे यात अत्याधुनिक मॉनिटरींग सिस्टमचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे आपत्कालीन स्थितीत ट्रेनची गती आपोआप कमी होईल. रेल्वेचा प्रसार जगात चीनमध्ये सर्वाधिक आहे. ज्याचा लाभ जगातील लोकसंखेच्या सुमारे ६०% लोक घेतात.