जगातील सर्वात मोठ्या Whisky चा लिलाव, किंमत ऐकून धक्का बसेल
या बाटलीची उंची 5 फूट 11 इंच आहे. त्यामध्ये 311 लिटरची व्हिस्की असल्याचं सांगण्यात आलं. या बाटलीवर कोट्यवधींची बोली लावण्यात आली होती.
whiskey bottle auction : जगातील सर्वात मोठ्या आकाराच्या व्हिस्की बाटलीचा लिलाव करण्यात आला आहे. या बाटलीला मिळालेली किंमत ऐकून तर धक्काच बसेल. या बाटलीची उंची 5 फूट 11 इंच आहे. त्यामध्ये 311 लिटरची व्हिस्की असल्याचं सांगण्यात आलं. या बाटलीवर कोट्यवधींची बोली लावण्यात आली होती.
स्कॉच व्हिस्कीची जगातील सर्वात मोठी बाटली लिलावासाठी काढण्यात आली. या बाटलीला एकाहून एक मोठी बोली लागली होती. ही बाटली 5 फूट 11 इंच उंच आहे. या बाटलीची किंमत 1.4 मिलियन डॉलर किंमत या बाटलीला मिळाली आहे.
या व्हिस्कीची बोली ऑनलाइन लागली होती. एका आंतरराष्ट्रीय कलेक्टरने ही बाटली घेतली आहे. त्याने लिलावात 10,85,88,900 रुपये देऊन ही बाटली विकत घेतली. ही बाटली साधारण 32 वर्ष जुनी असल्याची माहिती मिळाली आहे.
या व्हिस्कीला 'द इंट्रेपिड' असे नाव देण्यात आल्याचे लिलाव कंपनीने सांगितले. ही एकच बाटली असून 32 वर्षांपूर्वी ती तयार करण्यात आली होती. या व्हिस्की बाटलीची 2021 मध्ये गिनीज बुकमध्ये नोंदही करण्यात आली. या बाटलीमध्ये साधारण 444 व्हिस्कीच्या बाटल्यांएवढी व्हिस्की राहिल असा दावा करण्यात आला होता.
फाह माई होल्डिंग्स ग्रुप इंक आणि रोजविन होल्डिंग्स पीएलसी यांनी मिळून तयार केली आहे. या दोघांनी वडिलांच्या आठवणीत ही व्हिस्कीची बाटली तयार केली होती. त्यामुळे याला जेवढं मूल्य पैशांमध्ये आहे तेवढंच भाविकही असल्याचं समोर आला आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार ही व्हिस्की सोन्यासारखी आहे. चवीला सफरचंदांसारखी गोड आहे. प्रोजेक्टचे संस्थापक डॅनियल मोंक म्हणाले की, माझ्यासाठी आणि संपूर्ण टीमसाठी, 'द इंट्रेपिड नेहमीच पैशापेक्षा अधिक आहे.
वडील कॅप्टन स्टॅनले मोंक यांच्या आठवणीत ही व्हिस्की तयार करण्यात आली. ते स्वत: एक शोधक होते आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक अद्भुत गोष्टी साध्य केल्या. अशा परिस्थितीत त्यांच्या वाढदिवसानिमित्त व्हिस्कीच्या लिलावाचे आयोजन करण्यात आले होते.