Indian Man In Singapore Jail : सिंगापुरमध्ये राहाणाऱ्या एका 47 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या व्यक्तीचं नाव पेरियासामी मथियाझागन असं असून त्यांच्या बँक खात्यात चुकून SGD 25,000 म्हणजे भारतीय रुपयात 16 लाख रुपये जमा झाले. पण बँकेला पैसे परत करण्याऐवजी पेरियासामी यांनी ते पैसे काढून खर्च केले. इतकंच नाही तर त्यातील काही पैसे पेरियासामी यांनी भारतात आपल्या कुटुंबियांच्या खात्यात जमा केले. याप्रकरणी पेरियासामी यांना 9 आठवड्यांची तुरुंगावासाची (Jail) शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने या प्रकरणी पेरियासामी यांना दोषी ठरवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेरियासामी यांनी पैसे केले खर्च
एका प्लम्बिंग आणि इंजिनिअरिंग फर्मकडे त्या कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने पर्सलोन लोनसाठी अर्ज केला होता. याच कंपनीत दोन पेरियासामी यांनी एक वर्ष काम केलं होतं. कंपनीने त्या महिलेच्या बँक खात्यात पैसे टाकण्याऐवजी चुकून पेरियासामी यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले. कंपनीकडून पैसे पाठवण्यात आल्यानंतर त्याचा मेसेच महिलेच्या ईमेलवर आला. पण आपल्याला कोणतेही पैसे मिळाले नसल्याचं महिलेने कंपनीला कळवल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. 


कंपनीने केला संपर्क
चूक लक्षात येताच कंपनीने पेरियासामी यांना संपर्क केला आणि आपल्याकडून चुकून तुमच्या बँके खात्यात 16 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. तसंच पैसे कंपनीला परत करण्याची विनंती करण्यात आली. ज्या महिलेने लोन काढलं होतं, त्या महिलेनेही पेरियासामी यांना पत्र पाठवून पैसे आपल्या खात्यात वळवण्याची विनंती केली. पण पेरियासामी यांनी पैसे देण्यास नकार दिला. पेरियासामी यांनी तात्काळ पैसे काढून ते वैयक्तिक कारणासाठी खर्च केले होते. हे कळताच कंपनी आणि महिलेने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलीस तपासात पेरियासामी यांनी वेगवेगळाय चार खात्यात पैसे ट्रान्सफर केल्याचं उघड झालं. 


पेरियासामी यांनी 16 लाख रुपयांतून आपलं पर्सनल लोन चुकतं केलं होतं. तर एक हिस्सा आपल्या कुटुंबियांना पाठवून दिला. प्रकरण कोर्टात गेल्यानंतर पेरियासामी यांनी महिलेला पैसे परत देण्यासाठी काही दिवसांची सवलत मागितली. यासाठी महिन्याला ठराविक रक्कम महिलेच्या खात्यात जमा करण्याचे आदेश कोर्टाने दिले. पण पेरियासामी महिलेला एकही रुपया दिला नाही. अखेर कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी पेरियासामी यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.