Poor Food Names Translation in English by Chinese: जर तुम्ही महागडं तिकिट घेऊन विमानातून प्रवास करत असाल आणि तुमच्या समोर एअरहोस्टेसने मेन्यू कार्ड ठेवलं. पण मेन्यूकार्डमधील डिश पाहून तुम्हाला किळस आली तर. काहीसा असाच प्रकार चीनी एअरलाईन्समध्ये घडला आहे. चीनी एअरलाईन्समधल्या मेन्यूत चक्क इंपोर्टेड डॉग फूड (Imported Dog Food) नावाच्या डिशचा समावेश आहे. एका प्रवाशाने या मेन्यूकार्डचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यानंतर जगभरातून याची निंदा केली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेन्यूमध्ये डॉग फूड
कॉनराड नावाचा एक प्रवासी चीन इस्टर्न एअरलाईन्सच्या बिझनेस क्लासमधून प्रवास करत होता. लंच टाईमची वेळ झाल्यावर एअर होस्टेसने कॉनराड यांच्यासमोर मेन्यू कार्ड पेश (Foods in Chinese Airlines) केलं. पण हे मेन्यूकार्ड पाहून कॉनराड हैराण झाले. मेन्यू कार्डमध्ये चक्क इंपोर्टेड डॉग फूडची डिश होती. त्यांनी या मेन्यूकार्डचा फोटो काढून आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला. यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. 


श्वानांना विमानातून घेऊन जाण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागते. पण श्वानांसाठी वेगळं फूड देण्याची व्यवस्था विमानात नसते. किंवा त्यांच्यासाठी असलेल्या फूडचा मेन्यूकार्डमध्येही समावेश नसतो. एका युजरने चीनी एअरलाईन्स विमानात बसलेल्या प्रवाशांना श्वान समजतात का असा टोला लगावला आहे. एका युजरने चीनी लोक इंग्रजी भाषेच्या कशा चिंधड्या उडवतात याचं हे उत्तम उदाहरण असल्याचं म्हटलंय. या मेन्यूकार्डमध्ये 90 टक्क्याहून अधिक पदार्थांचं इंग्लिश टान्सलेशन चुकीच्या पद्धतीने करण्यात आलं आहे. हा एक आंतरराष्ट्रीक विनोद असल्याचं एका युजरने म्हटलंय. 


चीनमध्ये कुत्र्याचं मांस खाल्लं जातं. दक्षिण चीनमधल्या युलिन शहरात दर वर्षी जून महिन्यात डॉग मीट फेस्टिव्हलही साजरा केला जातो. त्यात जिवंत कुत्रे आणि मांजरांचं मांस विकलं जातं.


 


कीचं इंग्रजी ट्रान्सलेशन
चुकीच्यी इंग्रजी ट्रान्सलेशनची ही पहिलीच वेळ नाहीए. याआधीही त्यांनी अनेकवेळा स्वत:चा हशा करुन घेतला आहे. 2019 मध्ये भारतीय उद्योगपत आनंद महिंद्र यांनी चीनी जेवणाच्या मेन्यूचा एक फोटो शेअर केला होता. यात एका डिशचं नवा 'Delicious roasted husband' म्हणजे स्वादिष्ट्य भाजलेला पती असं होतं. यावर आनंद महिंद्रा यांनी एक कॅप्शनही लिहिला होता. यात त्यांनी म्हटलं होतं, मी माझ्या पत्नीला या हॉटेलमध्ये घेऊन जाणांआधी दहा वेळा विचार करेन. इथल्या पदार्थांची नावं वाचून माझ्या पत्नीला वेगळीच आयडीया मिळू शकते.