रस्त्यावर महिलेच्या गळ्यात पट्टा टाकला आणि... 1 मिनिट 26 सेकंदाच्या व्हिडिओत राक्षसी कृत्य कैद
Video Viral: देश असो की परदेश महिला आजही असुरक्षित आहेत. महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना आजही कमी झालेल्या नाहीत. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 1 मिनिट 26 सेकंदाच्या या व्हिडिओत आरोपीचं राक्षसी कृत्य कैद झालंय.
Video streets of New York City : एखादा माणूस किती राक्षसी आणि क्रुर असू शकतो हे दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) झाला आहे. जगात आजही महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना कमी झालेल्या नाहीत. अशीच एक धक्कादायक घटना अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात (New York) घडली आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या एका 45 वर्षांच्या महिलेवर मागून आलेल्या आरोपीने अचानक हल्ला केला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.
1 मे रोजीची भीषण घटना
न्यूयॉर्क पोस्टच्या बातमीनुसार ही घटना 1 मे रोजी पहाटे 3 वाजताची आहे. चेहरा कापडाने झाकलेला एका व्यक्तीने रस्त्यावरुन पायी चाललेल्या महिलेचा पाठलाग केला. ईस्ट 152 स्ट्रीवरची ही घटना आहे. व्हिडिओत या घटनेचा थरात कैद झालाय. महिलेला आपला कोणीतरी पाठलाग करतोय याचा थांगपत्ताही नव्हता. त्याचवेळी सफेद कापडाने चेहरा झाकेला एक व्यक्ती तिच्या मागून येतो. महिलेला काही कळायच्या आत आरोपीने महिलेच्या गळ्यात पट्ट्याचा फास टाकतो.
अचानक झालेल्या या हल्ल्यात महिला खाली कोसळते. त्यानंतर त्याच अवस्थेत आरोपी तिला खेचत घेऊन जातो. पट्ट्याचा फास आवळल्याने महिला बेशुद्ध पडते. यानंतर व्हिडिओत तो व्यक्ती महिलेला रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन कारच्या मध्ये नेतो आणि तिच्यावर बलात्कार करतो. बलात्कारानंतर आरोपी तिथून फरार झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकेतच नाही तर जगभरात या घटनेचे पडसाद उमटले असून महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशातही कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असल्याचा आरोप केला जात आहे.
पोलिसांनी सुरु केला तपास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु करण्यात आला आहे. न्यूयॉर्क पोलीस आरोपीचा शोध घेत असून विविध पथकं बनवण्यात आली आहे. या व्यक्तीची उंची 5 फूट 9 इंच असल्याचं सांगण्यात आलं असून त्याने स्वेटशर्ट आणि सफेद पँट परिधान केली होती. आरोपीसंबंधित काही माहिती मिळाल्यास कळवण्याचं आवाहनही पोलिसांनी केलं आहे.