World Oldest Whiskey : व्हिस्की.... पिणाऱ्यांपासून ते न पिणाऱ्यांपर्यंत अनेकांसाठीच हा कुतूहलाचा विषय. म्हणजे प्रत्यक्षात मद्यपान न करणाऱ्या मंडळींना मद्याचे प्रकार, त्यांच्या किमती, ते तयार करण्याची प्रक्रिया या साऱ्याविषयी कमाल कुतूहल असतं. अशाच मंडळींसाठी एक कमाल बातमी नुकतीच समोर आलिये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माहिती नसणाऱ्यांसाठी.... जगभरात जुन्या व्हिस्कीला सर्वाधिक मागणी असते. अशा बऱ्याच व्हिस्की तुम्ही आतापर्यंत पाहिल्या असतील. पण, आता त्यातलाच एक प्रकार समोर आला आहे जो सर्वात जुनी व्हिस्की म्हणून ओळखला जात आहे. 


नुकताच जगातल्या सर्वात जुन्या व्हिस्कीचा लिलाव सुरू झाला आहे. अमेरिकेत Sotheby’s कडून या सर्वात जुन्या व्हिस्कीचा लिलाव करत करण्यात येत आहे. देण्यात आलेल्या माहितीनुसार ती 81 वर्षे जुनी आहे. 'द मॅकलन द रीच' (The Macallan The Reach) असं या व्हिस्कीचं नाव आहे.


कधी बनवली ही व्हिस्की ?
'द मॅकलन द रीच' ही 81 वर्षांची व्हिस्की 1940 मध्ये बनवली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ती तयार करण्यात आली होती. सर्वप्रथम या व्हिस्कीची फक्त एकच बाटली तयार करण्यात आली होती. ही अत्यंत रिच, गोड आणि स्मोकी फिनिशसह 41.6 abvची डीप ऑबर्न सिंगल माल्ट व्हिस्की आहे.



अधिक वाचा : स्मशानभूमीत सापडलेलं 2600 वर्षांपूर्वीचं पनीर तुम्ही पाहिला का?


 


कुठे मिळेल ही old aged व्हिस्की?
सोथेबीजच्या बेबसाईटवर जाऊन तुम्ही या व्हिस्कीसाठी बोली लावू शकता. लिलावगृहाने बोली लावण्यासाठी 5 ऑक्टोबर ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. 'द मॅकलन द रीच'ची अंदाजे किंमत 96.72 लाख ते 1.75 कोटी रुपये ठेवण्यात आलfये. किंमत ऐकूनच आली ना झिंग? जो कोणी ही बोली जिंकेल त्याला 'द मॅकलन द रीच'च्या बाटलीसह एक कांस्य शिल्प मिळणार आहे.