World`s dirtiest man : बापरे! मागच्या 50 वर्षांत अंघोळ न केलेल्या व्यक्तीचा, अंगावर पाणी घेताच मृत्यू
World`s Dirtiest man म्हणून सध्या ज्यांच्या नावानं आणि अस्वच्छतेनं जगाच्या नजरा वळवल्या, त्या माणसानं नेमकी 5 दशकं अंघोळ का केली नाही यामागचं कारण समोर....
World`s Dirtiest man Dies : जगातल्या सर्वात घाणेरड्या व्यक्तीचा वयाच्या 94 व्या वर्षी मृत्यू झाला. आता ती व्यक्ती घाणेरडी हे ठरवलं कुणी, तर जगभरातील माध्यमांनी आणि त्या व्यक्तीच्या कृतींनी. कारण, अनेकांच्याच मते ते एक संन्यासी होते. जवळपास 5 दशकांनंतर त्यांनी अंगावर पाणी घेतलं, पण त्यानंतरच त्यांचा मृत्यू ओढावला. असं नेमकं का झालं? या प्रश्नाचं उत्तर अखेर समोर आलं आहे. (worlds dirtiest man amou Haji dies in iran months after first bath in 50 year)
अमोऊ हाजी (amou haji) असं त्या व्यक्तीचं नाव. त्यांनी 50 वर्षांपासून साबण, पाणी आणि एकंदरच स्वच्छतेपासून दुरावा पत्रला होता. अंघोळ केल्यास आपण आजारी पडू अशी भीती त्यांना होती. पण, अखेर दक्षिण इराणमधील (iran) फार्स प्रांतात राहणाऱ्या हाजी यांनी गावकऱ्यांच्या दबावामुळं शरीर स्वच्छ केलं. स्थानिक माध्यमांनुसार यानंतर ते आजारी पडले आणि पुढच्याच काही दिवसांत त्यांनी जगाचा निरोप घेतला.
अधिक वाचा : सर्वात मोठा खुलासा : 'हे' जीव कायम पाठवायचे संदेश, मात्र माणसाने केलेलं दुर्लक्ष...
एका जुन्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्याला साळींदर खायला आवडतं असं सांगितलं होतं. शिवाय गावकऱ्यांनीच बांधलेल्या एका झोपडीत आपण राहतो असं सांगत हे आयुष्य जगण्यामागे पुर्वायुष्यात मिळालेल्या कटू अनुभवंच्या आठवणी कारणीभूत आहेत असंही ते म्हणाले होते.
हाजी यांची काही कृत्य वाचून सध्या अनेकांनाच किळस वाटत आहे. कारण, ते कुजलेलं मांस खात होते, इतकंच नव्हे तर ते तेलाच्या एका जुन्या डब्यातून पाणी पित होते. धुम्रपान करण्यात ते बराच वेळ घालवायचे.
अधिक वाचा : इमारतीखाली सापडले 300 सांगाडे; निम्मे अवशेष लहान मुलांचे
शरीराच्या (hygiene) स्वच्छतेबाबत किंवा कोणी स्वच्छ पाणी पिण्याचा सल्ला दिला, तर त्यावरूनही ते नाराज होत होते. अशा या विचित्र व्यक्तीच्या कटू आठवणी जगाला कळू शकलेल्या नाहीत. कारण, त्यांचाही या व्यक्तीसोबतच अंत झाला आहे.