मुंबई : चहा... म्हणजे आयुष्य... असं म्हणणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील. म्हणजे आमच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट चहानेच होतो असंही म्हणणारे तुमच्या मित्रांच्या यादीत असतील. चहा... एक असं पेय, ज्याच्या एका घोटानं अशी काही जादू होते की सारा थकवा दूर होतो. (Worlds highest tea party)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एखाद्या थंडीच्या ठिकाणी किंवा सोसाट्याचा वारा सुटलेल्या ठिकाणी गेलं असता चहाचा कप हातात मिळाल्यावर याहून मोठं ते स्वर्गसुख काय, हीच प्रतिक्रिया अनेकजण देतात.  


अशाच चहाप्रेमी आणि ट्रेकवेड्या मंडळींची नजर खिळवून ठेवणारा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीमध्ये काही गिर्यारोहक जगातील सर्वोच्च शिखर समजल्या जाणाऱ्या माऊंट एव्हरेस्टच्या कॅम्प 2 येथे चहाची पार्टी करताना दिसत आहेत. 


Guinness World Recordsच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये समुद्रसपाटीपासून 21,312 फूट इतक्या उंचीवर असणाऱ्या एका तळावर चक्क सोसाट्याचा वारा सुटलेला असताना गरमागरम चहाची पार्टी करताना दिसत आहेत. 


फक्त चहाच नव्हे, तर चहासोबतच खाण्यासाठीही काही पदार्थांची रेलचेल या पार्टीत पाहायला मिळाली होती. जवळपास 14 जण या पार्टीत सहभागी झाले होते. सोशल मीडियावर या आगळ्यावेगळ्या चहापार्टीचा फोटो कमाल गाजत आहे. 



फक्त गाजतच नाहीये, तर घरात बसलेल्या, कामात गुंतलेल्या अनेकांनाच हा व्हिडीओ पाहून तो बॅगपॅक घेऊन फिरस्तीला जाण्यासाठी भाग पाडत आहे.