World's Most Expensive Beer: 'शौक बडी चीज है...' असं म्हणत जगाच्या पाठीवर अशी कैक मंडळी आहेत जी त्यांच्या आवडीनिवडी जपत असतात. काही मंडळी या आवडीनिवडींसाठी आयुष्यभराची कमाईसुद्धा पणाला लावतात, ज्यातून त्यांना आयुष्यभराचा आनंद मिळतो. याच आवडीनिवडींपैकी एक महागडा छंद किंवा आवड म्हणजे महागडी मद्य जमवण्याचं (Alcohol Collection). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मद्यप्राशनासाठी कैक मंडळी हजारो रुपये खर्च करतात. पण आता या खर्चालाही शह देणारी एक अशी गोष्ट समोर आली आहे जी पाऊन या मंडळींच्याही भुवया उंचावत आहेत. ही गोष्ट म्हणजे जगातील सर्वात महागडी बिअर. ही बिअर इतकी महाग आहे, की तिच्या किमतीत बंगला, आलिशान कारही खरेदी करता येऊ शकते. 


महागडी वाईन, शॅम्पेन आणि व्हिस्की याविषयी तुम्ही ऐकलं असेल. पण, कधी महागड्या बिअरविषयी ऐकलंय? संपूर्ण जगभरात बिअरची साधारण 140 वर्षे जुनी एक बाटली आहे, ज्यामध्ये असणारी बिअर ही सर्वात महागडी असल्याचं सांगितलं जातं. 'ऑलसॉप्स आर्कटिक एले' (Allsopp's Arctic Ale) असं या बिअरचं नाव. ही एक खास पद्धतीची बिअर असून, तिचं ऐतिहासिक महत्त्वं पाहता तिची गणती आर्टिफॅक्ट श्रेणीत केली जाते. 


फक्त किमतीच्या बाबतीतच नव्हे, तर इतर काही गुणांमुळं ही बिअर खास आहे. अँटीक्स ट्रेडच्या अहवालानुसार या सर्वात महागड्या बिअरची चर्चा ईबेवर सुरू झाली. जिथं ओल्काहोमातील एका खरेदीदारानं 2007 मध्ये ऑलसॉपच्या आर्क्टिक एलेची बाटली 304 डॉलरना खरेदी केली. या किमतीमध्ये मॅसाचुसेट्स विक्रेत्याकडून घेतल्या गेलेल्या $19.95 शिपिंग शुल्काचाही समावेश होता.


हेसुद्धा वाचा : UPSC परिक्षेतून नव्हे, बिझनेस स्कूलमध्यून निवडा IAS-IPS अधिकारी; नारायण मूर्ती यांचा मोदींना सल्ला 


antiquestradegazette.com च्या माहितीनुसार या बिअरच्या बाटलीवर असणाऱ्या लॅमिनेटेड कागदावर पर्सी जी बोल्स्टरची सही होती. ही बाटली त्यांना 1919 मध्ये परत मिळाल्याचा उल्लेख त्यावर आढळतो. उपलब्ध संदर्भांनुसार ही बिअर 1852 मधील एका पोलर एक्स्पीडिशनसाठी बनवण्यात आली होती. आर्क्टिक महासागराच्या माध्यमातून अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरांदरम्यान दोन्ही जहाजांवरील खलाशांचा शोध घेण्यासाठीच्या मोहिमेदरम्यान ही बिअरची बाटली सापडली होती. सध्याच्या घडीला या बिअरच्या बाटलीची किंमत आहे $5,03,300 म्हणजेच 4.05 कोटी रुपये.


किंमत पाहून थक्क झालात ना? कारण या बिअरच्या एका बाटलीसाठी जितकी किंमत मोजावी लागते, त्या किमतीत आलिशान बंगला, घर, वाहनं अशी अनेकांची अनेक स्वप्न साकार होतील, नाही का?