Worlds oldest Jeans : आजकाल जीन्स शिवाय लोक काही घालत नाही, लग्न समारंभ असो, पार्टी असो अथवा ऑफिस लोक जीन्स घालण पसंत करतात. त्याआधी लोक फॉर्मल पॅन्ट घालण पसंत करायचे. मात्र अनेक वर्षापासून ट्रेंड बदलला आणि आता लोक जीन्स जास्त प्रमाणात घालतात. त्यात आता एक जगभरातली सर्वांत जूनी जीन्स (oldest Jeans) समोर आली आहे. या जीन्सची विक्री देखील झाली आहे. या जीन्स पँटची सोशल मीडियावर एकच चर्चा आहे. 


हे ही वाचा : भावा जिंकलस रे! बाप-लेकाचा VIDEO पाहुन तुमच्याही डोळ्यात येईल पाणी 


जीन्सची खासियत? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगातली ही सर्वात जुनी जीन्स (oldest Jeans) असल्याची माहिती आहे.अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे एका जहाजाच्या दुर्घटनेत ती सापडली होता. बातम्यांनुसार 1857 मध्ये एक जहाज बुडाले होते. या जहाजाच्या अवशेषातून या जीन्स सापडल्या होत्या. आता ही जीन्स सुमारे 165 वर्षे जुनी आहे. या जीन्सचा आता लिलाव करण्यात आला आहे.  


ऐतिहासिक जीन्स कशी? 


दरम्यान ही ऐतिहासिक जीन्स (oldest Jeans) कोणी बनवली याबाबत अजूनही संभ्रम आहे. ही जीन्स लेव्ही स्ट्रॉस अँड कंपनीची असू शकते. परंतु अधिकृतपणे, या कंपनीने 1873 मध्ये पहिली जीन्स (oldest Jeans) बनवली होती, असे लोकांचे म्हणणे आहे. तर त्या काळात लेव्ही स्ट्रॉस कंपनी ड्राय गुड्स नावाच्या कंपनीचे घाऊक विक्रेते होते, अशा परिस्थितीत, 'कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून' सापडलेल्या जीन्स पॅनची सुरुवातीची आवृत्ती असू शकते, असे काही नागरीक म्हणतात. 


हे ही वाचा : भावाने नादच केला! ब्रिटनच्या रस्त्यावर चालवली रिक्षा, पाहा VIDEO


कुठे मिळाली जीन्स?


12 सप्टेंबर 1857 पूर्वी ही जीन्स (oldest Jeans) बनवली गेली असावी असा कयास आहे. कारण ज्या जहाजातून या जीन्स सापडल्या होत्या त्या जहाजाचा अवशेष 12 सप्टेंबर रोजी बुडाला होता. समुद्रातील वादळामुळे 1857 मध्येच हे जहाज अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोहून पनामामार्गे न्यूयॉर्कला जात होते. त्यावेळी हे जहाज बुडाले होते. या जहाजाच्या अवशेषातून या जीन्स सापडल्या होत्या.


कितीला झाला लिलाव? 


जगभरातील सर्वात जुनी जीन्स (oldest Jeans) लाख-दोन लाखात नाही तर तब्बल 94 लाख रुपयांना विकली गेली आहे. हा आकडा ऐकूण अनेकांना धक्का बसला आहे.  


दरम्यान या जीन्सची (oldest Jeans) सोशल मीडियावर एकच चर्चा आहे. या जीन्सच्या लिलावाची किंमत एकूण अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.