जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती Elon Musk भरणार इतका टॅक्स; शुन्य मोजनेही होणार कठीण
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क इतका टॅक्स भरणार आहे, की त्या आकड्यावरील शुन्य मोजने तुम्हाला कठीण होऊन बसेल.
वॉशिंग्टन : उद्योजक एलोन मस्क (Elon Musk) सुमारे 11 अब्ज डॉलरचा फेडरल कर भरणार आहेत. एवढ्या मोठ्या रकमेचा कर भरण्यासाठी त्यांनी टेस्ला (Tesla) कंपनीचे $15.4 अब्ज किंमतीचे शेअर्स विकले आहेत. इतकेच नाही तर मस्कला कॅलिफोर्नियाला अतिरिक्त $2 अब्ज प्राप्तिकर देखील भरावा लागणार आहे. मस्कने हा भरमसाठ कर भरण्यासाठी आपल्या कंपनीचे शेअर्स विकले होते. (World's Richest Person)
टेक्सासच्या मुख्यालयाची शिफ्टींग
आमचे सहयोगी संकेतस्थळ WION मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, एलोन मस्कची कंपनी टेस्ला अनेक वर्षांपासून कॅलिफोर्नियामध्ये होती. आता त्याने कंपनीचे मुख्यालय आणि घर दोन्ही टेक्सासमध्ये हलवले आहेत.
कर भरल्यानंतर जी रक्कम शिल्लक राहते, ती मस्क त्याच्या अन्य कंपनी 'स्पेसएक्स'मध्ये गुंतवणार आहे. त्यांनी इक्विटी विकून स्पेसएक्समध्ये पैसे उभारल्याचे यापूर्वी दिसून आले आहे.