नवी दिल्ली : कोविड साथी विरोधातील लढाईत भारताचे जगभर कौतुक होत आहे. भारतातील वैज्ञानिकांचा शोध आणि भारताने घेतलेल्या निर्णयाची प्रशंसा होत आहे. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि जागतिक आरोग्य संघटनेचे सरचिटणीस, टेड्रोस अधनम घेब्रेसस यांनी ट्विट करत भारताचं कौतुक केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी सोमवारी ट्वीट केले की, "कोविड -१९ विरुद्ध जगाच्या युद्धामध्ये भारताच्या वैज्ञानिकांचा पुढाकार आणि लस उत्पादक क्षमता पाहून आनंद झाला." त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान कार्यालयाला ही टॅग केले आहे.



याव्यतिरिक्त, जागतिक आरोग्य संघटनेचे सरचिटणीस टेड्रोस अधनम घेब्रेसस यांनीही ट्विट करुन भारताचे कौतुक केले आहे. त्यांनी लिहिले की, 'कोविड -१९' महामारी संपविण्याची वचनबद्धता व्यक्त करत भारत निर्णायक पावले उचलत आहे. आपण एकत्र काम केल्यास सर्वत्र प्रभावी आणि सुरक्षित लसची उपस्थिती सुरक्षित करण्यात सक्षम होऊ.' त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केले आहे.



हे उल्लेखनीय आहे की जगातील सर्वात मोठी कोविड -१९ लस अभियान भारतात सुरू होणार आहे. ऑक्सफोर्ड कोविड -१९ व्हॅक्सीन कोविशिल्ट आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन यांना रविवारी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मान्यता दिली. कोव्हिशिल्ट लसीची निर्मिती सीरम इन्स्टिट्यूटने केली आणि कोवॅक्सीनची निर्मिती भारत बायोटेकने केली आहे.