मुंबई : सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या भीषण संकटाशी लढा देतंय. तर अशातच युकेमध्ये एक चिंता वाढवणारी बाब समोर आली आहे. युकेमध्ये रहस्यमय पद्धतीने मांजरींचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मांजरींचा नेमका मृत्यू का होतोय याबबत सर्वांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संशोधकांच्या मते, मांजरींच्या वाढत्या मृत्यूमागील कारण मांजरींना दिल्या जाणाऱ्या अन्नाचा ब्रँड आहे. यूकेच्या प्राण्यांच्या डॉक्टरांच्या मते, गेल्या काही दिवसांपासून मांजरींमध्ये पॅन्सिटोपेनियाची (Pancytopenia) प्रकरणं सतत नोंदवली जात आहेत.


मांजरींच्या मृत्यूच्या मागे काय आहे कारण?


मांजरींना झालेल्या या आजारामध्ये व्हाइट ब्लड सेल म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी, प्लेटलेट्स आणि रेड ब्लड सेल म्हणजे लाल रक्तपेशी फार वेगाने कमी होतात. हेच मांजरींच्या या आजाराचं मुख्य कारण आहे. 


रॉयल पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या (आरव्हीसी) अहवालानुसार, आतापर्यंत एकूण 528 मांजरींमध्ये या आजाराची नोंद करण्यात आली आहे. या 528 प्रकरणांपैकी 63.5% जीवघेणे आहेत. तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, मांजरींच्या मृत्यूची वास्तविक प्रकरणं ही नोंदवलेल्या प्रकरणांपेक्षा खूप जास्त आहेत.


कॅट फूडमुळे पसरतोय आजार


अनेक मांजरांचे मालक त्यांच्या स्थानिक पशुवैद्यकीय रुग्णालयात या प्रकारची प्रकरणं नोंदवत आहेत. दरम्यान आरव्हीसी तज्ज्ञांना खात्री नाही की आजाराने ग्रस्त असलेल्या मांजरींची वास्तविक संख्या किती आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, देशभरात विकल्या जाणाऱ्या मांजरीना खायला देण्यात येणाऱ्या फूडमुळे हा आजार झाला असावा.


पशुतज्ज्ञांनी दिला इशारा


जूनमध्ये, उत्पादकांद्वारे सेन्सबरीच्या हायपोएलर्जेनिक मांजरीचे अन्न, एप्लाव्स आणि एव्हीएचे काही पॅकेज परत मागवतेच. स्थानिकांचा असा विश्वास आहे. की बऱ्याच लोकांना मांजरीचं अन्न कसं पाठवायचं हे माहित नसतं. दरम्यान स्थानिक पशुवैद्यकीय डॉक्टर त्यांच्या मांजरींना इमरजेंसीमध्ये ठेवण्याचा सल्ला देत आहेत.