वॉशिंग्टन : Attack on Salman Rushdie: भारतीय वंशाचे कादंबरीकार आणि लेखक सलमान रश्दी शुक्रवारी न्यूयॉर्कमध्ये एका व्याख्यानाच्या मंचावर असताना त्यांच्या मानेवर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान सध्या व्हेंटिलेटरवर असलेले सलमान यांना एक डोळा गमवावा लागण्याची शक्यता आहे.  त्यांच्या हातातील नसा कापल्या गेल्या आहेत. आणि त्यांच्या यकृताची या हल्ल्यात इजा पोहोचली आहे. त्यामुळ यकृताचे नुकसान झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी सांगितले. काही तासांच्या शस्त्रक्रियेनंतर, रश्दी व्हेंटिलेटरवर होते आणि शुक्रवारी संध्याकाळी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला म्हणून जगभरातील लेखक आणि राजकारण्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध केल्यानंतर ते बोलू शकले नाहीत.


लेखक सलमान रश्दी यांच्यावर अमेरिकेत जीवघेणा हल्ला


लेखक सलमान रश्दी यांच्यावर अमेरिकेत जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यांच्या गळ्याजवळ चाकूने सपासप वार करण्यात आले. यात ते गंभीर जखमी झालेत. त्यांची प्रकृती नाजूक आहे.सलमान रश्दी (Salman Rushdie) अमेरिकेतील पश्चिम न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. दरम्यान, त्यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमादरम्यान हा हल्ला करण्यात आला. रश्दी यांची ओळख करुन दिल्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.


सलमान रश्दी यांना 'द सैटेनिक वर्सेस' या पुस्तकाच्या लेखनावरुन धमकविण्यात आले होते. ही धमकी मिळाल्यानंतर त्यांच्यावर तब्बल 33 वर्षांनी हल्ला करण्यात आला.  शुक्रवारी सकाळी सलमान रश्दी सीएचक्यू 2022 च्या कार्यक्रमातील व्याख्यानासाठी मंचावर पोहोचले होते. यावेळी त्यांच्यावर चाकूने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.


न्यूयॉर्क पोलिसांनी याबाबत एका हल्लेखोराला अटक केले आहे. सलमान रश्दी मंचावर व्याख्यान देण्यासाठी जात असताना हा हल्ला करण्यात आला. जखमी अवस्थेत सलमान रश्दी यांना पोलिसांनी तात्काळ हेलिकॉप्टरने रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.


सलमान रश्दी यांच्या 'द सैटेनिक वर्सेस' या पुस्तकावर इराणमध्ये 1988 पासून बंदी घालण्यात आली आहे. काही मुस्लीम लोक या पुस्तकाला विरोध करत आहेत. इराणमधील दिवंगत नेता अयातुल्ला रुहोल्लाह खुमैनी यानं सलमान रश्दींविरोधात फतवा काढला होता. रश्दी यांना मारणाऱ्याला 3 दशलक्ष अमेरिकन डॉलरचं बक्षीस देण्याची घोषणा त्यानं केली होती.