मुंबई : हवाईयन बेटांच्या (Hawaiian Islands) अगदी उत्तरेला खोल समुद्राच्या मोहिमेत, शास्त्रज्ञांना असं काही दिसलं. जे पाहून ते ही हैराण झाले. पाण्याखाली खोल समुद्रात पिवळ्या विटांचा रस्ता आढळला. हे अनोखे दृश्य पाहून संशोधकांचा डोळ्यांवर विश्वास बसेना. पण प्रत्यक्षात हा रस्ता रस्ता नसून कोरडा पडलेला पुरातन तलाव होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे आश्चर्यकारक दृश्य एक्सप्लोरेशन वेसेल नॉटिलसने टिपले होते. हे सध्या या भागात सर्वेक्षण करत आहे.


PMNM हे जगातील सर्वात मोठ्या सागरी संवर्धन क्षेत्रांपैकी एक आहे. ते इतके मोठे आहे की अमेरिकेतील सर्व राष्ट्रीय उद्याने एकत्र केली तरी ती त्याहून मोठी होईल. पण आतापर्यंत त्याच्या फक्त ३ टक्के समुद्राच्या तळाचा शोध लागला आहे.



ओशन एक्सप्लोरेशन ट्रस्टचे संशोधक दररोज येथून थेट फुटेज देतात. अलीकडे, त्यांनी YouTube वर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये संशोधक एका खोल-समुद्रातील वाहनात समुद्रात शोध घेत असताना त्यांना पिवळा रस्ता दिसला तो क्षण त्यांनी कॅप्चर केला. हे दृश्य पाहून संशोधक आश्चर्यचकित झाले. काहींनी सांगितले की हा अटलांटिसचा मार्ग आहे, काहींनी याला विटांचा पिवळा रस्ता म्हटले आहे.


समुद्राखाली हजारो किलोमीटर अंतरावर असूनही संशोधकांनी शोधलेले हे सरोवर आश्चर्यकारकरीत्या कोरडे असल्याचे दिसून येते. 


चित्रात दिसणार्‍या विटा प्रत्यक्षात विटा नसून एका भागावर दगड अशाप्रकारे तुटलेला आहे की तो विटांसारखा दिसतो. पहिल्या दृष्टीक्षेपात, हे दृश्य एका अद्भुत जगाचा मार्ग असल्याचे दिसते.