नवी दिल्ली : यशस्वी लोकांच्या कथा आपण नेहमीच ऐकत असतो. आपणही यांच्याप्रमाणेच यशस्वी व्हावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. मात्र, हे यश मिळविण्यासाठी यशस्वी लोकांमधील गुणही आपल्यात असणं आवश्यक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही जे काम करता त्याचा थेट परिणाम दुसऱ्या दिवसाच्या कामावर होतो. त्यामुळेच जगातील सर्वाधिक यशस्वी व्यक्ती झोपण्यापूर्वी नेमकं काय करतात? हे जाणून घेणं महत्वाचं आहे.


चला तर मग पाहूयात जगातील काही यशस्वी लोकांच्या बेडटाईम हॅबिट्सबाबत...


बिल गेट्स, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक


  • रात्री झोपण्यापूर्वी वाचन करणं आवश्यक असल्याचं मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स मानतात.

  • बायोग्राफी, इतिहास, तत्त्वज्ञानाशी संबंधित पूस्तकांचे वाचन बिल गेट्स करतात. 

  • रात्री कमीत कमी ७ तास झोप घेतात. त्याशिवाय कामात मन लागत नाही.


बराक ओबामा, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष


  • रात्री झोपण्यापूर्वी वाचन आणि लिखाण करण्याची बराक ओबामा यांनाही सवय आहे. 

  • रोज मध्यरात्रीपर्यंत बराक ओबामा वाचन करतात आणि त्यासोबतच काहीतरी लिखाणही करतात. 

  • बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना ११ वाजेपर्यंत मीटिंग करत असत.

  • रात्री १ वाजता झोपतात आणि पून्हा सकाळी ७ वाजता त्यांची कामाला सुरुवात होते.


Elon Musk (File Photo)

अॅलन मस्क, टेस्ला कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी


  • अॅलन मस्क हे रात्री १ ते सकाळी ७ वाजेपर्यंत झोपतात. 

  • कधी-कधी दिवसभरात ७-८ डाईट कोक पितात. असे केल्याने त्यांना दिवसभर काम करण्याची शक्ती मिळते असं ते मानतात.


Stephen King (File Photo)

स्टीफन किंग, लेखक


  • अमेरिकेतील प्रसिद्ध लेखक स्टीफन किंग हे रात्री झोपण्यापूर्वी टूथब्रश नक्की करतात.

  • सर्व उशा एकाच दिशेला जमवतात. मात्र, या मागचं कारण त्यांनी अद्याप सांगितलेलं नाहीये. ही एक वेगळी सवय असल्याचंही ते मानतात.