पॉवर बॅंक खांद्यावर ठेवून झोपली आणि झोपेतच मृत्यू
सध्या स्मार्टफोनचा वापर खूप वाढलाय. त्यामुळे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जरची गरज असते. चार्जर नसेल तर प्रवासात अनेकवेळा गैरसोय होते. त्यामुळे पॉवर बॅंकची गरज निकड झालेय. हे छोटे उपकरण सहज कोठेही नेता येते आणि मोबाईल चार्ज करता येतो. मात्र, हे उपकरण मृत्यूलाही कारणीभूत ठरलेय.
मुंबई : सध्या स्मार्टफोनचा वापर खूप वाढलाय. त्यामुळे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जरची गरज असते. चार्जर नसेल तर प्रवासात अनेकवेळा गैरसोय होते. त्यामुळे पॉवर बॅंकची गरज निकड झालेय. हे छोटे उपकरण सहज कोठेही नेता येते आणि मोबाईल चार्ज करता येतो. मात्र, हे उपकरण मृत्यूलाही कारणीभूत ठरलेय.
एका नायझेरियन मुलीने मोबाईल चार्ज करण्यासाठी पॉवर बँकचा वापर केला. त्याचवेळी तिने आपला मोबाईल आणि पॉवर बॅंक खांद्यावर ठेवून ती झोपी गेली. त्यावेळी तिची एक चूक झाली. पॉवर बॅंक रिचार्ज करण्यासाठी तिने लावला होता. मात्र, यावेळी पॉवर बॅंक ओव्हरहीट झाला. त्यामुळे या तरुणीची स्किन जळाली आणि त्यानंतर तिला विजेचा शॉक लागला. यात तिचा मृत्यू झाला.
ज्यावेळी या तरुणीचे आई-वडील तिच्या रुममध्ये आले. त्यावेळी त्यांना हा प्रकार लक्षात आला. तोपर्यंत मुलीचा मृत्यू झाला होता. या घटनेचा त्यांना मोठा धक्का बसला.