मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात. येथे काही तरुण मंडळी वेगवेगळ्या कन्टेटन्टचा व्हिडीओ अपलोड करत असतात. जे पाहून आपलं मनोरंजन होतं. परंतु काही तरुण मंडळी ही प्रसिद्धीसाठी अशा काही गोष्टी करतात, जे त्यांच्यासाठी जीवघेणं ठरु शकतं. परंतु ते तरीही हे सगळं करतात आणि त्यासंबंधीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करतात. सध्या असंच एक प्रकरण समोर आलं आहे. जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर एका चॅलेंजच्या नादात तरुणाने दारुची अख्खी बाटली खाली केली. परंतु हे त्याला भलतंच महागात पडलं.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 10 जुलै रोजी स्थानिक वेळेनुसार रात्री 11.30 च्या सुमारास घडली. वास्तविक, या व्यक्तीने सुमारे 1 हजार रुपयांच्या चॅलेंजसाठी दारूची अख्खी बाटली संपवली. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की, हे कसं शक्य आहे? दारु तर सगळेच पितात, मग कोणाचा मृत्यू कसा होऊ शकतो? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हे माहित असाला हवं की, हे चॅलेंज नक्की काय होतं?


हे चॅलेंज असं होतं की, जो दारूची बाटली लवकर संपवेल, त्याला 1 हजार रुपये बक्षीस मिळेल. या तरुणानं ते चॅलेंज स्वीकारलं आणि त्याने अवघ्या 2 मिनिटांत दारुची बाटली संपवली. या बाटलीमध्ये 35 टक्के अलकोहोल होतं. या तरुणाने ते एका झटक्यात प्यायल्यामुळे त्याच्या हृदयावर याचा परिणाम झाला, ज्यामुळे त्याचा मृत्यू देखील झाला आहे.


या व्यक्तीचे वय 25 ते 30 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. तो दक्षिण आफ्रिकेतील हा-माशांबा गावाजवळ असलेल्या 'ब्लू कॉर्नर कार वॉश अँड लिकर रेस्टॉरंट'मध्ये मद्यपान करत होता.


या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे, यामध्ये बॅग्राउंडला म्यूजीक वाजत आहे. त्याचवेळी आजूबाजूला उपस्थित असलेले लोक या व्यक्तीला दारू पिण्यास प्रवृत्त करत आहेत आणि त्याला चिअर देखील करत आहेत. ज्यानंतर या तरुणाचा मृत्यू होतो.


2 मिनिटांत बिअर प्यायल्यानं तरुण आधी बेशुद्ध पडला, ज्यानंतर त्याला डॉक्टरांकडे नेण्यात आलं. ज्यानंतर त्याला डॉक्टरांनी मृत घोषीत केले.