नवी दिल्ली: लग्नासाठी योग्य वय नेमके किती? हा एक चर्चेचा आणि तितकाच वादग्रस्त मुद्दा. अनेक मंडळी यांवर चर्चीत चर्वण करतातही. पण, या सगळ्याच चर्चांना अर्जेंटिनातील एका तरूणाने आणि महिलेने उडवून लावल्याचे पुढे आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जेंटीनात चक्क एक अनोखा विवाह पहायला मिळाला आहे. यातील वर युवक आहे अवघ्या २३ वर्षांचा. तर, वधू महिला आहे चक्क ९१ वर्षांची. आता बोला. दोघेही एकमेकांना परिचीत असून, गेली अनेक वर्षे ते एकमेकांना ओळखतात. दोघे काही वर्षे एकत्र राहिले आहेत. पण, आता त्यांच्या लग्नाबाबत कायदेशीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे हे प्रकरण आता थेट न्यायालयात पोहोचले आहे.


माऊरिसियो ओसौला असे या युवकाचे नाव आहे. तर, योलांद टारेज असे वृद्ध महिलेचे नाव आहे. दोघांनी २०१५ मध्ये लग्न केले. काही दिवसांपूर्वीच योलांदचा मृत्यू झाला. त्यांच्या या विवाहाबद्धल कोणाला फारशी कल्पना नव्हती. मात्र, योलांदच्या मृत्यूनंतर माऊरिसियोने आपण तिचा पती असल्याने तिची उर्वरीत पेन्शन आपल्याला मिळावी अशी मागणी सरकारकडे केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी माऊरिसियोच्या मागणीवर आक्षेप घेतला.


दरम्यान, अद्याप हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. माऊरिसियोने केवळ स्वार्थापोटी योलांदा या महिलेसोबत विवाह केल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे म्हणने आहे.