मास्को : आपण बर्‍याचदा अशा लोकांना पाहिले असेल जे रागावले की कधीकधी कॉफीचे मग तोडतात. टीव्ही सुरु झाला नाही तर काही जण रिपोट भिंतीवर आपटतात. तर कधी चांगले जेवण मिळाले नाही तर प्लेट फेकून देतात. पण आपण कधी पाहिले आहे का, एखाद्या व्यक्तीला इतका राग आला की त्याने आपल्या लक्झरी कारलाच आग लावली?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एखाद्या व्यक्तीला राग आला तर तो रागाच्या भरात काय करु शकतो, याचा अंदाज लावणे कठिण. रशियात एका पट्ट्याने आपली दोन कोटींची मर्सिडीज कार रॉकेल टाकून पेटवून दिली. या व्यक्तीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. कारची किंमत २ कोटी ५८ लाख ८६ हजार ८७५ (३५०,०००डॉलर्स) पेक्षा जास्त सांगितली जात आहे.


लक्झरी कार YouTuberच्या रागाचा बळी ठरली. आम्ही येथे तुम्हाला अशा एका व्यक्तीबद्दल सांगत आहोत ज्याने संतापाच्या भरात आपल्या मर्सिडीज कारवर रॉकेल टाकून पेटवून दिली. या व्यक्तीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.  या व्यक्तीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. कारची किंमत २ कोटी ५८ लाख ८६ हजार ८७५ (३५०,०००डॉलर्स) पेक्षा जास्त सांगितली जात आहे. एका व्यक्तीच्या रागामुळे अशा महागड्या गाडीची राखरांगोळी झाली.


रशियामधील ही व्यक्ती मिखाईल लिटविन आहे. त्याचे YouTube चॅनेल आहे. विशेष म्हणजे स्वत: मिखाईलने संपूर्ण घटना रेकॉर्ड केली आहे आणि सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.


दरम्यान, रशियातील मिखाइल लिटविन या यूट्यूबरने प्रसिद्ध होण्यासाठी चक्क मर्सिडीज कार  (Mercedes) जाळल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या या करामतीमुळे त्याच्या लोकप्रियतेमध्ये प्रचंड वाढ झाली. यूट्यूबवर त्याचे ५-१० नाही तर ५० लाख सब्सक्रायबर्स आहेत. इन्ट्राग्रामवर त्याला १.१६ कोडी लोकं फॉलो करतात. त्याच्याकडे जीटी ६३एस या मॉडेलची मर्सिडीज होती.