YouTuber त्या दुर्लक्षित बेटावर पोहोचताच काही विवस्त्र लोकांनी त्याला घेरलं; सुरुवातीला सर्वकाही ठीक होतं पण पुढे....
Viral Video : एका दुर्लक्षित बेटावर अशा कोणत्या समुदायाचं वास्तव्य आहे, याची कल्पनाही त्यानं केली नव्हती. त्याचा कासी घाबरवणारा अनुभव तुम्ही पाहिला?
Viral Video : असं म्हणतात, की माणूस जितका फिरतो तितकाच तो समृद्ध होतो. प्रगल्भ विचार करु लागतो. त्याच्या किंवा तिच्या आयुष्यात ठेहराव येतो. याच भटकंतीतून काही अशाही गोष्टी अनुभवायला मिळतात ज्या पाहून आपल्या वाट्याला बऱ्याच सुखसोयी असुनही आपण का बरं रडत बसतो, हाच विचार आपण करु लागतो. हा असाच एक आगळावेगळा अनुभव नुकताच एका (You tube travel vlogs) युट्यूब ट्रॅवल व्लॉगरला आला आणि त्यानं तो सर्वांसोबत शेअरही केला. हा अनुभव वेगळा यासाठी होता, कारण त्यानं अशा समुदायाची भेट घेतली, जो जगाच्या या प्रवासात कुठेतरी लोप पावण्याच्या मार्गावर असल्याचं पाहायला मिळत आहे. (Travel Vlogs)
Brodie Moss असं या युट्यूबरचं नाव असून, तो मुळचा ऑस्ट्रेलियाचा आहे (Brodie Moss You tube channel). यावेळी त्यानं northern Vanuatu येथील एका दुर्लक्षित बेटाला भेट देण्याचा निर्णय घेतला आणि त्या रोखानं प्रवासही सुरु केला. तो ज्यावेळी त्या बेटावर पोहोचला तेव्हा पाण्यातून उतरून त्याला समुद्री खडकांमधूनच बेटावर प्रवेश करायचा होता. तिथं त्याच्या स्वागतासाठी आदिवासी जमातीतील अनेकांनीच गर्दी केली होती. हातात काठ्या, भाले, झाडपाल्यापासून तयार करण्यात आलेली आणि किमान शरीर झाकणारी वस्त्र असं त्यांचं रुप होतं. प्रचंड किंकाळ्या, गोंधळ आणि आदळ आपट करत त्यांनी ब्रोडीचं स्वागत केलं. त्याच्यासाठी हे सर्वकाही इतकं अनपेक्षित होतं की सुरुवातीला त्याला धडकीच भरली.
हेसुद्धा पाहा : जगभरातील सोने संपणार? पृथ्वीवर आता फक्त इतके टक्केच उरलंय? जाणून घ्या
या मंडळींनी त्याला खेचतच पुढे नेण्यास सुरुवात केली. तुरळत झाली असणाऱ्या जंगलवाटेवून त्याला एके ठिकाणी नेलं, जिथं त्या गावच्या राजानं त्याचं स्वागत केलं. गर्दी हळुहळू वाढत गेली.
अतिथी देवो भवं,चा अनुभव
जिथं त्या आदिवासी जमातीसाठी हा युट्यूबर म्हणजे कुतूहलाचा विषय होता तिथेच त्याच्यासाठीसुद्धा हे सर्वकाही तितकंच नवं होतं. त्यामुळं शहरातून असं कोणीतरी आपल्याकडे येण्याचा क्षण त्या समुदायासाठी कोणत्याही सणाहून कमी नव्हता. मग काय? या मंडळींनी शक्य त्या सर्व परींनी त्याचं स्वागत केलं, त्याच्यासाठी मेजवानी आणि मनोरंजनासाठी पारंपरिक नृत्य सादरीकरणाचं आयोजनही केलं. ब्रोडीनं शेअर केलेल्या इन्स्टाग्रामवरील व्हिडीओला लाखोंच्या संख्येनं व्ह्यूज मिळाले आहेत. तुम्ही अशा कोणत्या भागाला भेट दिलीये का?