झिम्बाब्वेमध्ये तणाव, रस्त्यावर उतरले लष्कराचे टँक
जगात कुठेही देशाच्या लष्कराने जेव्हा व्यवस्था हातात घेतली तेव्हा तिथे परिस्थिती वाईट झाली आहे. असंच काही झिम्बाब्वेमध्ये दिसत आहे. जेथे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांची सत्ता पालट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नवी दिल्ली : जगात कुठेही देशाच्या लष्कराने जेव्हा व्यवस्था हातात घेतली तेव्हा तिथे परिस्थिती वाईट झाली आहे. असंच काही झिम्बाब्वेमध्ये दिसत आहे. जेथे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांची सत्ता पालट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
झिम्बाब्वेचे अधिकृत चॅनेलवर देशावर लष्करी ताबा असल्याच्या बातम्या चालवल्या जात आहेत. चॅनलवर असे म्हटले जात आहे की, राजधानी हरारेमध्ये गोळीबार आणि स्फोटांचा आवाज ऐकण्यात आला. शहरात लष्कर आणि लष्कराचे टँक सर्वत्र दिसत आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या मते, राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबेच्या निवासाजवळ गोळीबारचा आवाज ऐकू आला.
सैन्य दलाने मात्र हे फेटाळून लावले आहे. राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे हे पूर्णपणे सुरक्षित आहे आणि गुन्हेगारांना लक्ष्य करण्यासाठी हे कार्य केले गेले आहे. मुगाबे यांच्या पक्षाने गेल्या आठवड्यात लष्करप्रमुखांवर देशद्रोहाचा आरोप केला होता. त्यानंतर दोघांमध्ये तणाव वाढला होता.
आतापर्यंत या संपूर्ण घटनेवर मुगाबे यांचं कोणतेही विधान आलेलं नाही. लष्कराने त्या लोकांची नावे नाही सांगितली ज्यांना त्यांनी लक्ष्य केलं. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या माहितीनुसार, लष्कराने अटक केलेल्या लोकांमध्ये अर्थमंत्री इग्नाटिअस कॉम्बो देखील आहेत. देशामध्ये ही लष्करी कारवाई कोणी केली हे अजून स्पष्ट झालेलं नाही.