WPL Auction 2023 Live Updates : ऑक्शनमध्ये करोडोंची बोली, आतापर्यंत 34 खेळाडूंचा लिलाव
WPL Auction 2023 Live Updates : आजचा दिवस जगभरातील महिला क्रिकेटर्ससाठी ऐतिहासिक असणार आहे. कारण पहिल्यांदाच महिला IPL (Wpmen`s Premier League) चं ऑक्शन सुरुवात झाली आहे. त्यामुळे WPL लिलाव 2023 बद्दल प्रत्येक अपडेटबद्दल जाणून घ्या.
WPL Auction 2023 Live Updates : ऐतिहासिक महिला IPL (Women's Premier League) साठीचा पहिला लिलाव मुंबईच्या जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सुरु झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) प्रथमच आयपीएलच्या धर्तीवर या स्पर्धेचे आयोजन केल आहे. WPL 2023 लिलावासाठी निवडलेल्या 409 खेळाडूंपैकी 246 भारतीय आहेत. आठ सहयोगी देशांसह 163 खेळाडू परदेशी आहेत. (WPL Auction 2023 Live Updates womens ipl auction auction players base price live streaming mumbai in marathi)
Latest Updates
आतापर्यंतचे लिलाव झालेले खेळाडू
राधा यादव- 40 लाख, दिल्ली कॅपिटल्स (भारत)
शिखा पांडे- 60 लाख, दिल्ली कॅपिटल्स (भारत)
मारिजाने कॅप- 1.5 कोटी दिल्ली कॅपिटल्स (साउथ अफ्रीका)
स्नेह राणा- 75 लाख, गुजरात जायंट्स (भारत)
पार्श्वी चोपड़ा- 10 लाख, यूपी वॉरियर्स (भारत)
टिटास साधू- 25 लाख, दिल्ली कॅपिटल्स (भारत)
श्वेता सेहरावत- 40 लाख, यूपी वॉरियर्स (भारत)
एस. यशश्री- 10 लाख, यूपी वॉरियर्स (भारत)महिला प्रीमिअर लीगच्या पहिल्या हंगामासाठी आता पर्यंत एकूण 34 खेळाडूंवर बोली लावण्यात आली आहे. आतापर्यंत या खेळाडूंसाठी 44 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यात 15 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. आतापर्यंत भारताची स्मृती मनधाना ही सर्वात महागडी खेळाडू ठरली असून तिच्यावर 3.40 कोटी रुपयाची बोली लागली.
आतापर्यंतचे टॉप खेळाडू
3.4 कोटी रुपये - स्मृति मनधाना (भारत) - RCB
3.2 कोटी रुपये - एश्ले गार्डनर (ऑस्ट्रेलिया) - GG
3.2 कोटी रुपये - नेट साइवर-ब्रंट (इंग्लंड) - MI
2.6 कोटी रुपये - दीप्ति शर्मा (भारत) - UPW
2.2 कोटी रुपये- जेमिमा रोड्रिग्स (भारत) - DC
2.0 कोटी रुपये - शेफाली वर्मा (भारत) - DC
2.0 कोटी रुपये - बेथ मूनी (ऑस्ट्रेलिया) - GG
1.8 कोटी रुपये - हरमनप्रीत कौर (भारत) - UPW
1.8 कोटी रुपये - सोफी एक्लेस्टोन (इंग्लैंड) - UPWऋचा घोष आणि यास्तिकावर मोठी बोली
भारताची यास्तिका भाटियावर मुंबई इंडियन्सने 1.5 कोटीची बोली लावत आपल्या संघात घेतलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 19 वर्षांच्या ऋचा घोषला 1.9 कोटी रुपयांत विकत घेतलं. तर ऑस्ट्रेलियाची दिग्गज एलिसा हिली हिच्यावर यूपी वॉरिअर्सने 70 लाख रुपयांची बोली लावलीजेमिमा रोड्रिगेजवर मोठी बोली
टी-20 वर्ल्ड कप 2023 च्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानाला पराभवाचा धक्का देणाऱ्या जेमिमा रॉड्रगेजवर मोठी बोली लावण्यात आली आहे. दिल्ली कॅपिटल्सने जेमिमाला 2.20 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात जेमिमाने 53 धावा केल्या आहेत.महिला प्रिमिअर लीग आतापर्यंतची बोली
दीप्ति शर्मा- यूपी वॉरियर्स, 2.60 कोटी (भारत)
रेणुका सिंह- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 1.50 कोटी (भारत)
नॅटली स्कीवर- मुंबई इंडियंस, 3.20 कोटी (इंग्लंड)
ताहिला मॅक्ग्राथ- यूपी वॉरियर्स, 1.40 कोटी (ऑस्ट्रेलिया)
बेथ मूनी- गुजरात जायंट्स, 2 कोटी (ऑस्ट्रेलिया)
एमिला केर- मुंबई इंडियंस, 1 कोटी (न्यूजीलंड)
शबमन इस्माइल- यूपी वॉरियर्स, 1 कोटी(साउथ अफ्रीका)WPL Auction 2023 Live Updates : महिला प्रीमियर लीग-2023 ऑक्शन
हरमनप्रीत कौर- मुंबई इंडियंस, 1.80 कोटी (भारत)
एलिसा पेरी- रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु, 1.70 कोटी (ऑस्ट्रेलिया)
सोफी डिवाइन- रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु, 50 लाख (न्यूझीलंड)
WPL Auction 2023 Live Updates : महिला प्रीमियर लीग-2023 ऑक्शन
सोफी एलेस्टोन- यूपी वॉरियर्स, 1.80 कोटी (इंग्लंड)
WPL Auction 2023 Live Updates : महिला प्रीमियर लीग-2023 ऑक्शन
एश्ले गार्नर- गुजरात जायंट्स, 3.20 कोटी (ऑस्ट्रेलिया)
WPL Auction 2023 Live Updates : भारताची स्फोटक सलामीवीर स्मृती मानधना 3.40 कोटीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला संघाने विकत घेतलं आहे.