Mumbai Crime : मुंबईत (Mumbai News) लहान भावानेच मोठ्या भावाला मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी (Mumbai Police) या प्रकरणी मोठ्या भावाला अटक केली आहे. हल्लेखोरांना दोन लाख रुपयांची सुपारी देऊन कौटुंबिक वादातून मोठ्या भावाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी व्यापाऱ्यासह चौघांना अटक केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दोघे भाऊ नागपाडा येथे एकत्र राहत होते. कुलाबा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हल्लेखोरांनी पीडित इम्रान युनूस नमकवाला (46) यांच्यावर 31 जुलै रोजी काळा घोडाजवळ लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला होता. त्यामुळे इरफान नमकवाला यांच्या चेहऱ्यावर आणि छातीवर जखमा झाल्या होत्या. धाकट्या भावाला धडा शिकवण्यासाठी इम्रान नमकवाला यांच्यावर लहान भाऊ इरफान नमकवाला याने हल्ला करण्यास सांगितले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक इम्रान युनूस नमकवाला यांचा नागपाडा येथील घरी त्यांचा धाकटा भाऊ इरफान याच्याशी पंधरा दिवसांपूर्वी शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यादरम्यान इम्रान यांनी भावाला कानाखाली मारली होती. याचा राग आल्याने इरफानने इस्लाम कुरेशी (34), सलीम मन्सूर शेख (23) आणि लोकेंद्र रावत (28) या तीन जणांना मोठ्या भावावर हल्ला करण्यास सांगितले होते.


इरफानने रावतशी संपर्क साधून त्याचा धाकटा भाऊ इम्रानवर हल्ला करण्यासाठी त्याला पैसे दिले. त्यानंतर रावत, कुरेशी आणि शेख यांनी नमकवाला यांच्या राहत्या घराजवळ एकदा रेकी केली होती. 31 जुलै रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास रावत आणि कुरेशी यांनी कुलाबा येथील जहांगीर आर्ट गॅलरीजवळ इम्रान यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते.


नागपाडा येथील मित्रासोबत कारने घरी जात असताना कुरेशी आणि रावत यांनी त्यांचा पाठलाग केला. जहांगीर आर्ट गॅलरीजवळ कारचे टायर पाहण्यासाठी इम्रान गाडीच्या बाहेर पडताच रावतने त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. हल्ल्यानंतर जखमी झालेल्या इम्रान यांना तात्काळ सैफई रुग्णालायात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर कुलाबा पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता.


पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजवरून हल्लेखोरांच्या बाईकचा नोंदणी क्रमांक मिळाला होता. संशयितांनी नंबर प्लेट लपवून ठेवली होती. त्यामुळे फक्त 08 असे क्रमाकं दिसत होते. त्याद्वारे पोलीस आरोपींचा शोध घेण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी 7 ऑगस्ट रोजी बाईकचा मालक इस्लाम कुरेशी याला शिवडी येथील राहत्या घरातून पकडले होते. पोलीस चौकशीत कुरेशीने शेख आणि रावत यांची नावे घेत या प्रकरणाता नमकवालाचाही सहभाग असल्याचे सांगितले. त्यानंतर दोन दिवसांनी शेखला शिवडी येथून अटक करण्यात आली.


त्यानंतर पोलिसांनी तपास करत मुख्य आरोपी रावत याला अटक केली आहे. रावत हा नेपाळचा रहिवासी असून तो 2020 मध्ये तुरुंगातून बाहेर पडला होता. तेव्हापासून विविध गुन्ह्यामध्ये पोलीस त्याचा शोध घेत होता. परळ येथील वंचित बहुजन आघाडीच्या दोन सदस्यांवर प्राणघातक हल्ल्याप्रकरणीही पोलीस त्याचा शोध घेत होते. 12 ऑगस्ट रोजी कुलाबा पोलिसांना रावत विरार स्थानकात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कुलाबा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने पोलिसांना मारहाण करून पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.