नवी दिल्ली : फिनिश कंपनी एचएमडी ग्लोबलने नोकियाचा नवा स्मार्टफोन आज शुक्रवारी भारतीय बाजारपेठेत लॉन्च केलाय. नोकिया 7.1 या नावाने हा स्मार्टफोन ऑफलाईन आणि ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी हा स्मार्टफोन दोन महिन्यापूर्वी जागतिक बाजारपेठेत दाखल करण्यात आला. हा फोन लंडनमध्ये लॉन्च करण्यात आला. हा फोन दोन प्रकार उपलब्ध असणार आहे. 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी आरएएम + 64 जीबी बोर्ड स्टोरेज क्षमता असणार आहे. नोकिया 7.1 हा फोन 7 डिसेंबरपासून कंपनीच्या ऑनलाईन आणि ऑफ रिटेलर्सवर भारतात उपलब्ध होणार. नोकिया 7.1 च्या 4 जीबी / 64 जीबी आवृत्तीची किंमत 19,999 रुपये असेल, असे कंपनीकडून सांगण्यात आलेय.

नोकिया प्रथमच अॅड्राइड सिस्टीमवर उपलब्ध असणार आहे. Android One हा "प्यूअरडिस्प्ले" स्क्रीन तंत्रज्ञानयुक्त हा पहिला स्मार्टफोन आहे. नोकिया 7.1 एचडीआर रूपांतरणासाठी रियलटाइम एसडीआर देखील आहे. याचा अर्थ आपण एचडीआर चांगल्या गुणवत्तेत तुम्ही मनोरंजनचा लाभ घेऊ शकता. अन्य स्मार्टफोनमध्ये ही सुविधा नसते, असा दावा करण्यात आलाय.

"PureDisplay" स्क्रीन टेक्नोलॉजीमुळे वापरकर्त्यांना या वेगळा अनुभव घेता येणार आहे. उच्च गुणवत्ता आणि तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. यामुळे अधिक स्पष्टता घेता येऊ शकते, असा कंपनीने दावा केला आहे.


मोबाईलचे ही आहेत वैशिष्ट्ये


स्मार्टफेंन ड्युअल Android सिरीज 6000 अॅल्युमिनियम फ्रेम हिरे आकर्षक असा हा स्मार्टफोन आहे. स्मार्टफोनमध्ये 12 एमपी + 5 एमपी ड्युअल कॅमेरे जेएईआयएसएस ऑप्टिक्ससह आणि ऑटोफोकस सक्षमतेचा आहे. प्रखर आणि कमी प्रकाशामध्ये या स्मार्टफोनमुळे डोळयांना त्रास होणार नाही, असा हा नोकिया अॅन्ड्रॉईड स्मार्टफोन आहे.

हे उपकरण क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेटद्वारे चालविले जाते. या स्मार्टफोनची बॅटरी क्षमता 3060 एमएएच आहे. यूएसबी टाइप-सी फास्ट-चार्जिंग होते. पोर्टने तर 30 मिनिटांमध्ये फोन ते 50 टक्के चार्ज होतो.