मुंबई: गेली 21 वर्षे गझल गायक पंकज उदास 'खजाना- गझल का फेस्टिव्हल'च्या माध्यमातून थॅलेसेमिक मुले आणि कर्करोगग्रस्तांसाठी निधी उभारण्याचे कौतुकास्पद काम करत आहेत. कोविडमुळे गेल्या दोन वर्षांपासून हा कार्यक्रम ऑनलाइन सादर केला जात होता.
आता कोविड  निर्बंध उठल्यानंतर हा कार्यक्रम 29 जुलै आणि 30 जुलै रोजी  मुंबईत आयोजित केला जाईल.महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पंकज उदास, रेखा भारद्वाज, तलत अजीज, राहुल देशपांडे, प्रियंका बर्वे, पूजा गायतोंडे, खजाना  टॅलेंट हंट विजेते सुरेंद्र कुमार रावल सहभागी होणार आहेत.
याच कार्यक्रमाची प्रेस कॉन्फरन्स नुकतीच पार पडली यावेळी सर्व गायक उपस्थित होते यावेळी प्रियांका आणि प्रतिभा सिंग यांनी एक आलाप गायलंय आणि त्याचा सुंदर व्हिडीओ पोस्ट केलाय



स्वतः प्रतिभा सिंगने हा व्हिडीओ पोस्ट केलाय ज्यात आम्ही गाणं गायचं थांबवू शकत नाही असं कॅप्शन दिलाय ,या व्हिडिओला प्रचंड लाईक्स मिळत आहेत शिवाय त्यांच्या फॅन्सनी हा व्हिडीओ भरपूर शेअर देखील केलाय.