रवी पत्की, क्रिकेट समिक्षक: चालू इंग्लंड दौऱ्याच्या पहिल्या दोन कसोटी नंतर ही मालिका 2002 च्या भारतातील ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत मालिकेच्या किंवा 2005 च्या इंग्लंडमधील ऍशेस मालिकेच्या तोडीची होणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे इंग्लंडचा संघ भारतीय कंडिशन्स मध्ये देखील 'बाझबॉल' चा प्रयोग बिनधास्तपणे करत आहे आणि त्यात त्याला दोन कसोटीनंतर 50% यश मिळाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही कसोटी मिळून इंग्लंडने भारतापेक्षा फक्त 78 धावाच कमी केल्या आहेत. त्यांच्या स्पीनर्स नी भारताच्या स्पिनर्स पेक्षा 8 विकेट्स जास्त काढल्या आहेत. दोन्ही कसोटीतील पीचेस स्पोर्टिंग होती.स्पिनर्स ला खूप मदत करतील अशी पीचेस भारताने तयार केलेली नाहीत. कारण भारतीय बॅट्समनचा आता स्पिन खेळण्यात पूर्वीसारखा दरारा राहिलेला नाही. आपणच आपल्या जाळ्यात अडकलो तर नामुष्की व्हायची.


भारताच्या दृष्टीने जमेची बाजू म्हणजे  कोहली,राहुल,जडेजा,पंत,शामी हे पाच संघाला परिपूर्ण आणि सशक्त बनवणारे खेळाडू नसताना भारताने दुसरा सामना जिंकला तसेच पहिल्या सामन्यात कोहली ,पंत, शामी नव्हते. इंग्लंडचा नेहमीचा पूर्ण संघ मैदानावर उतरतोय. इंडलंडच्या स्पिनर्स ची पहिल्या कसोटीत भारताच्या पहिल्या इनिंग मध्ये bowling बघितल्यावर त्यांचे फार काही होईल असे वाटले नाही. पण दुसऱ्या इनिंग पासून हार्टलीला लय सापडलेली दिसली.


स्पिनरच्या हुकुमतीतिल मालिकेत बुमराह आणि अँडरसन ची bowling त्यांच्या ग्रेटनेसची साक्ष देत आहे. Wobble seam नी अँडरसन ने रोहितला बोल्ड केलेला बॉल आणि बुमराहने पोपला टाकलेला यॉर्कर 'अचाट' ह्या श्रेणीतील होते. इंग्लंडला मालिका जिंकायची असेल तर जो रूटने runs करायला हव्यात. बाझबॉलच्या भरात त्याचे शॉट selection चुकत आहे. इंग्लंडच्या बऱ्याच बॅट्समनचा रिव्हर्स स्वीपचा प्रयोग यशस्वी होतोय ही भारतासाठी डोकेदुखी आहे. ह्या शॉटमध्ये जोखीम असली तरी प्रचंड सरावाने हा शॉट सातत्याने मारता येऊ शकतो हे इंग्लंडने दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे ह्या शॉट वर त्यांचे कोणी बाद झालेले नाही. पिचवर अधिक बाऊन्स असेल तर हा शॉट जास्त रिस्की होईल.


फक्त बॅटिंग आणि bowling नाही तर captaincy मधिल आक्रमकता हे बाझबॉलचे वैशिष्ट्य दिसते.बेन स्टोक्स अत्यंत प्रयोगशील कर्णधार आहे. तो खेळ कधीच एकमार्गी होऊ देत नाही. सतत फिल्डिंग बदलणे,नवीन नवीन attacking positions ला फिल्डर्स उभे करणे ह्या डावपेचांमुळे तो बॅट्समनला मानसिक रित्या कायम संभ्रमात ठेवतो. त्याची captaincy बॅट्समन ला मानसिकरित्या थकवणारी आहे.T20 च्या मानसिकते मुळे आजकाल जगभरच बॅट्समन संयमी राहिलेले नाहीत.त्यात बॅट्समनला डिवचणारी आणि सततची innovative फिल्ड placing  असेल तर बॅट्समनच्या संयमाचा टाईम बॉम्ब टिक टिक करायला सुरुवात करतोच करतो. नव्या थिअरी प्रमाणे सलग 3 ओव्हर्स मेडन गेल्या तर चौथ्या ओव्हरला बॅट्समन विकेटची संधी देतोच.


कोहली,राहुल,पंत नसल्याने भारताची middle order कमजोर आहे. सहाव्या क्रमांकावर अक्षर पटेल येतो म्हणजे भारताने देखील bowling सशक्त करून bowling नेच बाझबॉलचा पराभव करायचा अशी रणनीती आखलेली दिसते.


बॅटिंग मध्ये तोल ढळू न देता शांत चित्ताने इंग्लंडच्या आक्रमक डावपेचाना संयमाने सामोरे जाणे आणि bowling मध्ये प्रत्येक इंग्लंच्या बॅट्समनच्या weakness चा अभ्यास करून प्रत्येक बॅट्समनच्या बाझबॉल ला नवीन डावपेचांनी साखळीने बांधून ठेऊन टिपणे ह्या मंत्राने भारताला उरलेले तीन सामने खेळावे लागतील. भारताच्या डेटा analysts ला मोठे काम आहे.त्यांनी अत्यंत परिणामकारक inputs शोधून काढले आणि त्याची पिचवर अंमलबजावणी झाली तर मोठा फरक पडेल.


बाझबॉल ब्रँड रिस्की आहे पण इंग्लंड हे ब्रँड खेळून 80 ते 90 % टेस्टस जिंकत आहे.हे अचाट आहे. भारतासाठी भारतामध्ये हे मोठे आव्हान आहे. सारे क्रिकेटजग ह्या मालिकेकेकडे अत्यंत उत्सुकतेने बघत आहे. भारताने बाझबॉलचा घरेलू कंडिशन्स मध्ये पराभव करायलाच हवा. फक्त क्रिकेटची आर्थिक महासत्ता असून भागणार नाही.इंग्लंडला हरवावेच लागेल. भारतात बाझबॉलच्या युनियन जॅकचे आरोहण आम्ही क्रिकेट फॅन्स सहन करू शकत नाही. इज्जत का सवाल है  Go India Go.