पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले सहकार मंत्री बाळासाहेब भारदे (Cooperation Minister Balasaheb Bharde) यांचा नुकताच स्मृतिदिन झाला. महाराष्ट्रातील सर्वच क्षेत्रात ठसा उमटवणारे व्यक्ती म्हणजे बाळासाहेब भारदे (Balasaheb Bharde)... राजकारण, समाजकारण, अध्यात्म, सहकार, पत्रकारिता (Politics, social causes, spirituality, cooperation, journalism) अशा सर्व क्षेत्रांत त्यांचा ठसा होता. अनेक मोठं मोठी पद भूषवून देखील अत्यंत साधेपणा त्यांनी आयुष्यभर जपला आणि समाजासमोर एक चांगला आदर्श (Good example) निर्माण केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेवगावमधील भारदे कुटुंब 
बाळासाहेब भारदेंचा जन्म 25 मे 1914 साली अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात (Shevgaon  Ahmednagar ) झाला. भारदे कुटुंब हे मुळचे शेवगावमधीलच. बाळासाहेबांचे वडील शिवरामपंत भारदे (Shivrampant Bharde) यांचा एक प्रकांड पंडित म्हणून शेवगावमध्ये दबदबा होता.ते देखील समाज कार्यात आग्रेसर नेहमी असायचे. त्यांचाच प्रभाव बाळासाहेबांवर पडला.


राजकीय कारकीर्द 
बाळासाहेब भारदे हे प्रथम 1952 साली निवडून आमदार ( First became MLA) झाले. त्यानंतर ते स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले सहकार मंत्री 1957 साली (First Co-operation Minister of Maharashtra) झाले. बाळासाहेब भारदे यांनी केलेले कार्य संपूर्ण देशाने गौरविले. त्यानंतर ते विधानसभेचे सलग 10 वर्ष अध्यक्ष म्हणून निवडले (Speaker of Legislative Assembly) गेले.1962 साली महाराष्ट्र विधानसभेचे सभापती (Speaker of Legislative Assembly) आणि पुन्हा 1967 साली सभापती पदी फेरनिवड त्यांची करण्यात आली.


भारदे हे गांधीवादी विचारवंत
बाळासाहेब भारदे हे मुरब्बी राजकारणी (Marmalade politician) तर होतेच. त्याचबरोबर ते गांधीवादी विचारवंत, संत साहित्याचे अभ्यासक, सहकार क्षेत्रातील अग्रणी, पत्रकारही आणि कीर्तनकार (Gandhian thinker, scholar of saint literature, co-operative pioneer, journalist and kirtan singer) होते. त्यांच्यावर गांधी विचारांचा पगडा असल्याने त्यांनी गांधीच्या विचारधारेवरच समाजकारण आणि राजकारण (Social cause politics) केले. त्यांनी जाती-धर्माच्या संस्था (Institutions of caste and religion) आणि संघटनांना कायम दूर ठेवले. त्यांनी उच्च पदांवर काम करताना अनेक चांगले पायंडे पाडले.


राजकारणातील संत 
बाळासाहेब भारदे यांचा राहणीमान अत्यंत साध (Living conditions are very simple) होतं. धोतर, सदरा आणि डोक्यावर गांधी टोपी (Dhotar, Sadra Gandhi cap) घातलेले भारदे राजकारणातील संत (Bharda is a saint of politics) म्हणूनच ओळखले जायचे. राजकारण, अध्यात्म, समाजकारण किंवा सहकार आणि पत्रकारिता (Politics, Spirituality, Social Cause Cooperation Journalism) या सर्वच क्षेत्रांत त्यांनी आपल्या कार्याचा आणि विचारांचा ठसा उमटविला. त्यांच्या कार्यामुळे भारत सरकारने बाळासाहेब भारदे यांना 2001 साली पद्मभूषण पुरस्कार (Padma Bhushan Award) देऊन गौरव केला.


पत्रकार संघाचे अध्यक्ष
बाळासाहेब भारदे हे 1951 साली जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष (President of District Journalists Association) झाले. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतच नगरला मराठी पत्रकार परिषदेचे अकरावे अधिवेशन भरवण्यात आले. धुळ्याच्या स्वतंत्र भारतचे संपादक अ.वि.टिळक (A. V. Tilak) हे अधिवेशनाचे अध्यक्ष होते. मावळते अध्यक्ष आचार्य प्र.के.अत्रे (Pr.K.Atre) देखील अधिवेशनास उपस्थित होते. बाळासाहेब हे अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष होते. दोन वर्षांनी मुंबईत झालेल्या तेराव्या अधिवेशनाचे अध्यक्षपद बाळासाहेब भारदेंना मिळालं. ह.रा. महाजन यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या जागेवर बाळासाहेब भारदेंची अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली होती. मुंबईच्या अधिवेशनानंतर मात्र बाळासाहेबांचा पत्रकारितेशी फारसा संबंध ठेवला नाही. कारण ते राजकारणात कमालीचे व्यस्त झाले.


नवनवीन योजना


आमदार म्हणून बाळासाहेब भारदे काम करताना अनेक नवनवीन गोष्टी त्यांना आपल्या मतदार संघात केल्या.तसेच बाळासाहेब भारदेंनी महाराष्ट्राला न संपणारे विचारधन तर दिलेच त्याचबरोबर अनेक नावीन्यपूर्ण योजनाही त्यांनी महाराष्ट्राला दिल्या. आताच्या राजकारण्यांनी बाळासाहेब भारदे (Balasaheb Bharde) यांच्या कार्याचा आदर्श आवर्जून घ्यावा असाच आहे.